अहमदनगर । वीरभूमी- 18-Jul, 2021, 12:00 AM
कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत नाही तोच पुन्हा जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज वाढ झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात तब्बल 758 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे नगरकरांची आकडेवारी चिंता वाढवणारी ठरत आहे.
मागील काही दिवसापासून कमी होत असलेली कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होवू लागली आहे. रविवारी आढळलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने 758 चा आकडा गाठल्याने जिल्ह्यातील उपचार घेणार्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे काल शनिवरी पारनेर तालुका टॉपवर होता. मात्र आज रविवारी आढळलेल्या आकडेवारीत पारनेरसह नगर ग्रामीण, राहुरी तालुक्यांतील आकडेवारीत शनिवारच्या तुलनेत घट झाली आहे. मात्र इतर तालुक्यांची आकडेवारीमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शनिवारच्या तुलनेत रविवारी तब्बल 168 कोरोना बाधितांने वाढ झाली आहे. यामध्ये खाजगी प्रयोगशाळा व अँटीजेन चाचणी अहवालात वाढ झाली आहे. नागरिकांनी गर्दी टाळत नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 18, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 338 तर अँटीजेन चाचणीत 402 असे 758 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 119, पाथर्डी 86, पारनेर 78, कर्जत 77, शेवगाव 54, नगर शहर 46, अकोले 46, नेवासा 43, श्रीगोंदा 36, कोपरगाव 35, श्रीरामपूर 34, राहाता 25, नगर ग्रामीण 25, जामखेड 25, राहुरी 18, इतर जिल्हा 10, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
Comments