अहमदनगर । वीरभूमी- 22-Jul, 2021, 12:00 AM
आज गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात 789 कोरोना बाधित आढळले.
अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी कासवगतीने वाढत आहे. तसेच पारनेर तालुकाही टॉपवर राहत आहे. आज आढळलेल्या बाधितांच्या आकड्यामध्ये पारनेरने पुन्हा शंभरी पार केली असून आज 158 कोरोना बाधित आढळले आहेत.
तर दुसर्या स्थानावर पाथर्डी तालुका असून येथे 88 कोरोना बाधित आढळले आहेत. त्या खालोखाल श्रीगोंदा 87, कर्जत 81 चा क्रमांक लागतो. आज आढळलेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालाचा आकडा 246 वर गेल्याने जिल्ह्याचा आकडा वाढला आहे.
नागरिकांनी घराबाहेर पडतांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापवारा, हात स्वच्छ धुवावे, सोशल डिस्टिन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 246, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 200 तर अँटीजेन चाचणीत 343 असे 789 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 158, पाथर्डी 88, श्रीगोंदा 87, कर्जत 81, संगमनेर 66, जामखेड 55, शेवगाव 48, अकोले 36, नगर ग्रामीण 32, नगर शहर 31, नेवासा 29, कोपरगाव 22, राहाता 18, श्रीरामपूर 14, राहुरी 12, इतर जिल्हा 08, भिंगार 03, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
Comments