अकोले । वीरभूमी- 23-Jul, 2021, 12:00 AM
भाजप अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात अनेक गावांमध्ये भाजपाच्या शाखांची उद्घाटने होत असून त्याला गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शनिवारी तालुक्यातील गणोरे, देवठाण, वीरगाव, अकोले शहर, सुगाव फाटा, कळस बुद्रुक, कळस खुर्द या गावांमध्ये युवा वारियर्स शाखांचे उद्घाटने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
युवकांच्या माध्यमातून भाजप युवा मोर्चाची जोरदार बांधणी करून भाजपचे कार्य, विचारधारा, विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम माजी आ. वैभवराव पिचड हे करत आहेत. युवकांना भाजपमध्ये जास्तीतजास्त काम करण्याची संधी मिळावी, या दृष्टिकोनातून आज शनिवार दि. 24 रोजी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते व माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा वारीयर्स शाखा उद्घाटन सोहळा होत आहे.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रमदादा पाटील, भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आ. वैभवराव पिचड, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे हे उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. 24 रोजी सकाळी 11 वाजता अकोले तालुक्यातील गणोरे, सकाळी 11:30 वाजता देवठाण, दुपारी 12 वाजता विरगाव, दुपारी 1:30 वाजता अकोले शहरातील महात्मा फुले चौक, दुपारी 1:45 वाजता अकोले शहरातील इंदिरानगर, दुपारी 2:30 वाजता पॉलिटेक्निक कोकेज येथे युवा वारियर्स यांच्या समवेत चर्चा व बैठक होणार असून तेथे पुढील रणनीती ठरणार आहे. त्यानंतर भाजप पक्ष कार्यालयात दुपारी 3:30 वाजता माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद होणार आहे.
त्यानंतर पुन्हा दुपारी 4 वाजता सुगाव फाटा, दुपारी 4:30 वाजता कळस बुद्रुक, दुपारी 4:45 वाजता कळस खुर्द येथे युवा वारीयर्स शाखांचे उदघाटने होणार आहेत. त्यानंतर माजीमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे संगमनेरकडे प्रस्थान होणार आहे.
तरी या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी व जास्तीत जास्त युवकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम पाटील भांगरे, तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, सुशांत वाकचौरे, युवा मोर्चाचे सरचिटणीस भूषण जाधव, ज्ञानदेव निसाळ, मदन आंबरे, सचिन शेटे, हितेश भाऊ कुंभार यांनी केले आहे.
Comments