अहमदनगर । वीरभूमी- 24-Jul, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारी आज शुक्रवारच्या तुलनेत घट झाली असली तर बाधितांचा आकडा मोठा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 729 कोरोना बाधित आढळून आले. शुक्रवारच्या तुलनेत आज 55 ने घट झाली आहे.
नगर जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल 784 कोरोना बाधित आढळले होते. मात्र आज यामध्ये 55 ने घट होत हा आकडा 729 वर आला आहे. मात्र संगमनेर तालुका पुन्हा टॉपवर आला असून आजची आकडेवारी शंभरी पार आहे. आज संगमनेरात 103 कोरोना बाधित आढळले. दुसर्या स्थानावर श्रीग़ोंदा 96, तिसर्या स्थानावर पाथर्डी 79 असा क्रम लागतो.
मागील आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत थोडी थोडी वाढ होत आहे. काल शुक्रवार पर्यंत एकुण रुग्णसंख्या 2 लाख 92 हजार 03 वर पोहोचली तर 2 लाख 81 हजार 813 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 4 हजार 89 वर पोहोचली असून कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा 6 हजार 101 वर पोहोचला आहे.
कासवगतीने वाढत असणार्या रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 184, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 239 तर अँटीजेन चाचणीत 306 असे 729 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 103, श्रीगोंदा 96, पाथर्डी 79, पारनेर 61, कर्जत 55, अकोले 53, नगर शहर 53, नगर ग्रामीण 43, शेवगाव 41, राहुरी 38, राहाता 30, कोपरगाव 24, जामखेड 19, श्रीरामपूर 14, नेवासा 10, इतर जिल्हा 09, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
rcpyjgdZbq