पाच हजाराची लाच घेतांना शाखा अभियंता चर्तुभूज
पाथर्डी । वीरभूमी- 29-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी पंचायत समिती अंतर्गत कामत शिंगवे येथील रस्त्याची दुरुस्ती केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी ठेकेदाराकडून 5 हजार रुपयाची लाच स्विकारतांना पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंत्याला लाचलुचपतच्या पकथाने रंगेहात पकडले. लाचखोर शाखा अभियंत्याचे नाव रामभाऊ दुधाराम राठोड (वय 43, रा. नाथनगर, पाथर्डी) असे आहे.
या शाखा अभियंत्याने 4 लाख रुपये खर्चाचे बील मंजुरी साठी 2 टक्के प्रमाणे तक्रारदार ठेकेदाराकडे 8 हजार रुपयाची मागणी केली होती. या प्रकारामुळे पाथर्डी पंचायत समितीतील टक्केवारी जनतेसमोर आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संबधित तक्रारदार ठेकेदार यांनी पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील 0.33 ते 1/600 या रस्त्याची दुरुस्ती केली होती. या कामाचे बील रक्कम 4 लाख रुपये मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी केलेल्या कामाचे एम. बी. रेकॉर्डवर सही करण्यासाठी लोकसेवक रामभाऊ राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे 2 टक्के प्रमाणे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तामुळे तक्रारदार ठेकेदाराने अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली होती. या दरम्यान लोकसेवक राठोड यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपयाची मागणी केली होती. त्याप्रमाणे आज दि. 29 रोजी तडजोडी अंती 5 हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज दि. 29 रोजी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रुपयाची लाच स्वीकारतांना लोकसेवक रामभाऊ दुधाराम राठोड यांना सापळा रचुन रंगेहात पकडले.
ही कारवाई अहमदनगरचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. दीपक करांडे यांच्या सुचनेवरुन पोनि. शाम पवरे, पो. ना. रमेश चौधरी, पो. अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, राधा खेमनर, चालक पो. हवा. हारुण शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.
पाथर्डी पंचायत समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता यांनी तक्रारदार ठेकेदाराकडून केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी बीलाच्या 2 टक्के रक्कमेची मागणी केल्याचे समोर आल्याने पाथर्डी पंचायत समितीतील टक्केवारी उघड झाली आहे. या टक्केवारीला आळा घालण्यासाठी वरीष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
EJtlseRxTy