पाथर्डी तालुक्यातील या ग्रामपंचायतीने गाळेधारकांना बजावल्या नोटीसा
करंजी । वीरभूमी- 08-Aug, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर विना परवाना पक्के बांधकाम (Unlicensed pucca construction) केल्याच्या कारणावरून 17 गाळेधारकांना ग्रामपंचायतीने नोटीसा बजावल्या आहेत. (The Gram Panchayat has issued notices to the squatters.) यामुळे अवैध बांधकाम करणार्या गाळेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर असे की, सन- 2012 साली तिसगाव ग्रामपंचायतीने गट नंबर 296 मध्ये 17 व्यावसायिकांना तात्पुरते पत्र्याचे शेड उभारूण व्यावसायासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी काही व्यापार्यांनी ग्रामपंचायतीने घालून दिलेले नियम व अटी धाब्यावर बसवत पत्र्याचे शेड बाजूला करत त्या ठिकाणी पक्के बांधकाम केले.
यामुळे काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होत कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यावरुन ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांनी यासर्व बांधकामाची पाहणी केली.
या पहाणीमध्ये अनेकांनी ग्रामपंचायतच्या जागेत पक्के बांधकाम करून भाडेपट्टाच्या कराराचा व शर्तीचा भंग केला. तसेच पक्के बांधकाम केल्याची व अधिकची जागा बळकावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लक्षात आले. यामुळे ग्रामपंचायतने वकीलामार्फत अशा 17 गाळेधारकांना नोटीसा बजावून आठ दिवसात पक्के बांधकाम काढून घेण्याच्या सुचना केल्या आहेत.
या नोटीसा अॅड. सी. एन. सातपुते यांच्या मार्फत पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतची बळकावलेली जागा मोकळी करून देण्यात यावी अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे दिला आहे.
या नोटीसांमुळे ग्रामपंचायत जागेवर अवैध बांधकाम करणार्या व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता हे गाळेधारक आपले बांधकाम काढून घेत जागा मोकळी करून देणार की नाही? हे पहावे लागणार आहे.
LSdrClmFPpVB