अहमदनगर । वीरभूमी- 11-Aug, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात आज बुधवारी तब्बल 908 कोरोना बाधित आढळले आहे तर 851 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 96.18 टक्के इतकी असून आतापर्यंत तब्बल 2 लाख 96 हजार 251 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 5 हजार 423 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज बुधवारी आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर पुन्हा टॉपवर आला आहे. पारनेर तालुका दुसर्या स्थानावर असून शेवगाव व पाथर्डी तालुके तिसर्या स्थानावर आहेत. दिवसेंदिवस कासवगतीने कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आज बुधवारी आढळलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 206 कोरोना बाधित आढळले आहेत. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 362 आणि अँटीजेन चाचणीत 340 रुग्ण बाधीत आढळले.
नगर जिल्ह्यात आढळलेले तालुकानिहाय कोरोना बाधित पुढील प्रमाणे - संगमनेर 152, पारनेर 133, शेवगाव 84, पाथर्डी 84, राहाता 56, नगर ग्रामीण 54, अकोले 53, नेवासा 50, कर्जत 49, श्रीरामपूर 45, राहुरी 37, श्रीगोंदा 33, कोपरगाव 31, नगर शहर 25, इतर जिल्हा 11, जामखेड 10, भिंगार 01 असे एकुण 908 कोरोना बाधित आढळले.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये नगर शहर 32, अकोले 44, जामखेड 14, कर्जत 40, कोपरगाव 33, नगर ग्रामीण 47, नेवासा 57, पारनेर 132, पाथर्डी 58, राहता 42, राहुरी 14, संगमनेर 158, शेवगाव 70, श्रीगोंदा 71, श्रीरामपूर 29, इतर जिल्हा 09 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.
यामुळे जिल्ह्याची एकुण रुग्ण संख्या 3 लाख 8 हजार 8 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत तब्बल 2 लाख 96 हजार 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना आतापर्यंत 6 हजार 334 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात तब्बल 5 हजार 423 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
XRpeudtxBjqgHlZ