अहमदनगर । वीरभूमी- 13-Aug, 2021, 12:00 AM
बुधवारी रात्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णय अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी कायम ठेवला आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील दुकाने आता रात्री 10 पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढून राज्यात ऑक्सिजनची आवश्यकता 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त भासू लागल्यास कोणत्याही क्षणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे निर्बंधात सुट मिळाली असली तरी नागरिकांना व व्यावसायिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच दुकानदार व तेथे काम करणारे कर्मचारी यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले पाहिजे, अशी अट घातली आहे. याबाबतचे आदेश आज शुक्रवारी दुपारी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या सहीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. हे आदेश दि. 15 ऑगस्ट पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू होणार आहेत.
राज्य सरकारने बुधवारी रात्री संपुर्ण राज्यात कोरोना निर्बंध शिथील करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेतला हे निर्बंध जिल्ह्यात शिथील होतील की नाही, अशी साशंकता जिल्ह्यातील नागरिक व व्यावसायिकांना होती.
मात्र राज्य शासनाने प्रमाणेच निर्बंध शिथील करून जिल्हाधिकारी यांनी दिलासा दिला आहे. या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील व्यावसायिकांना आपली दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. मात्र दुकानदार व तेथील कर्मचारी यांचे लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण होऊन 14 दिवसाचा कालावधी झालेला असवा.
उपहारगृहे आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहेत. येथेही सर्व कर्मचारी यांचे लसीकरण झालेले पाहिजे, अशी अट घातली आहे. विवाह सोहळ्यासाठी खुल्या जागेत 200 जणांना तर बंदिस्त हॉलमध्ये 100 जणांना परवानगी देण्यात आली आहे.
शॉपिंग मॉलसाठीही वेळ रात्री 10 पर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र येथे कर्मचार्यांसह मॉलमध्ये येणार्यांसाठीही लसीचे दोन डोस पुर्ण होणे गरजेचे आहे. खेळाची मैदाने, व्यायामशाळा यांचेसाठीही वरील प्रमाणे नियम असणार असून व्यायामशाळा बंदिस्त असल्यास दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवाव्या लागणार आहे.
तर सिनेमा व नाट्यगृह, धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच ठेवावे लागणार आहेत. तर औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व कर्मचार्यांचे लसीकरण पुर्ण झालेले असल्यास पुर्ण वेळ देण्यात आली आहे. आंतरराज्य प्रवास करायचा असल्यास कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस होणे गरजेचे आहे.
मात्र राज्यात 700 मेट्रिक टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची मरज पडल्यास तातडीने कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे.
Saturday & sunday Closed or open