उदय नरे । वीरभूमी- 21-Aug, 2021, 12:00 AM
मुंबई - राज्यात ज्येष्ठ संपादक व संस्थापक राजा माने (raja mane)यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गतीने विस्तार होत असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (Digital Media Editors Press Association) महाराष्ट्राचे मुंबई अध्यक्ष संजय भैरे यांच्या प्रयत्नाने गोरेगाव विभागीय कार्यालयाचा उद्घाटन (Inauguration of Goregaon Divisional Office) सोहळा मोठ्या उत्साहात मालाड येथे पार पडला.
अक्राँस मुंबई अक्राँस स्टेट (Mumbai Across State) या वृत्तपत्र समुहाचे मालक, संपादक संघटनेच्या मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे व सौ. सुचिता संजय भैरे यांच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालकाचे माजी उपसंचालक देवेंद्र भुजबळ, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त अजय वैद्य, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अमित मेहता, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे, अभिनेते सुदेश म्हशीलकर, राजू राहिकवार (ज्युनियर शाहरूख खान) उपस्थित होते.
तसेच उद्घाटन कार्यक्रमाला ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघोळे, रमेश शर्मा, मनोज देवकर, समिर विजय कुमार, कपिल गुप्ता, जालंदर चकोर, आरजू चहांडे, अरुषा पांडे, अॅड. प्रदीप भट, सुनील कामत, पंडित मोहिते पाटील, सुरेंद्र खानविलकर, सचिन सावंत, देवेंद्र खन्ना रिध्दी बत्रा, सुचिता भैरे, श्रीराज नायर, आशा मेनन, महेश कदम, विरेंद्र मिश्री, नागेश कळसगौंड, दत्ता जाधव, हर्षद मोरे, मनोहर मोरे आदी मान्यवर उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुचिता पाटील यांनी केले. अक्राँस स्टेट वृत्तवाहिनी समुहाचे मालक, संपादक संजय भैरे यांनी आभार मानले.
ckqbzatOZrdCS