दोन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
विजय उंडे । वीरभूमी- 28-Aug, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा ः श्रीगोंदा-कर्जत सीमेवर (shreegonda - karjat On the border) असणार्या लोहकरा नदीच्या (Lohkara river) पलीकडे कर्जत तालुक्यातील मावळे वस्तीवरील दोन शाळकरी मुलांचा नदीच्या अलीकडे असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव (shedgaon) शिवारातील भवानी माता मंदिर परिसरात असलेल्या शेततळ्यात पोहताना बुडून दुर्दैवी मृत्यू (Unfortunate death by drowning while swimming in a field) झाला आहे. ही घटना शुक्रवार दि. 27 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या शाळकरी मुलांची नावे हरी नामदेव कोकरे (वय 15 वर्षे) (hari namdev kokare) व विरेंद्र रामा हाके (virendra rama hake) (वय 16 वर्षे, दोघे रा. मावळेवस्ती, ता. कर्जत) अशी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील मावळेवस्ती येथील हरी नामदेव कोकरे व विरेंद्र रामा हाके हे शाळकरी मुले कोरोना काळात शाळेला सुट्टी असल्यामुळे शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात गेले. मंदिर परिसरात पुणे येथील चोपडा यांच्या शेतजमीनीत शेततळे आहे. दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले. परंतु त्यांना शेततळ्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.
संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान फक्त शेळ्या घरी आल्याने कुटुंबीयांनी मुले घरी का आली नाहीत म्हणून शोधाशोध सुरू केली. घरच्यांनी शोध घेतला असता मुलांचे कपडे व चपला भवानी माता मंदीरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ दिसल्या.
त्यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. त्याला बाहेर काढल्यावर तो मृत आढळला तर दुसर्याचा शोध घेताना अंधार पडल्याने अडथळा येत होता. परंतु पेडगाव येथील आसिफ शेख व समीर शेख या तरुणांनी पाण्यात बुडी घेऊन रात्री नऊ-साडेनऊ वाजेच्या सुमारास दुसर्यालाही पाण्यातून बाहेर काढले.
शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे कर्जत-श्रीगोंदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
WNIuXcjSRUVqKBZ