शेतकर्याचे आर्थिक नुकसान । शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
उद्धव देशमुख । वीरभूमी- 29-Aug, 2021, 12:00 AM
बोधेगाव ः शेवगाव (shevgaon) तालुक्यातील बालमटाकळी (balamtakali) येथील अशोक रमेश म्हस्के या तरुण शेतकर्याच्या फळबागेतील सुमारे शंभर सीताफळांची (Custardapple) अज्ञात व्यक्तीने कत्तल केल्याची (Slaughtered) घटना शुक्रवार दि. 27 रोजी रात्रीच्या वेळेस बालमटाकळी शिवारातील गट नंबर 41/5 मध्ये घडली. तोडण्यात आलेली सीताफळांची झाडे (Custard apple trees) ही सुमारे दोन वर्षाची आहेत.
याबाबत अशोक म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालमटाकळी येथील अशोक रमेश म्हस्के या तरुण शेतकर्याने आपल्या गट नंबर 41/5 मधील दीड एकर क्षेत्रावर दोन वर्षांपूर्वी उसनवार करून तसेच बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन आपल्या दीड एकर क्षेत्रात 650 सीताफळाच्या झाडाची लागवड केली होती.
त्याला दोन वर्षांपासून जीवापाड जपले होते आणि ऐन फळ लागायच्या कालावधीतच शुक्रवार, दि. 27 रोजीच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी 650 सीताफळांच्या झाडांपैकी तब्बल 100 च्या आसपास झाडे धारदार हत्याराच्या सहाय्याने खोडापासून तोडून टाकली आहेत.
शनिवारी सकाळी अशोक म्हस्के हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. सीताफळांची झाडे तोडलेली पाहिल्यानंतर अशोक म्हस्के यांनी घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर बोधेगाव दुरक्षेत्राचे सपोनि. भागवान बडधे, पो. कॉ. नामदेव पवार, महसूल विभागाचे तलाठी बाबासाहेब अंधारे, कृषी सहाय्यक गणेश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.
नुकसानग्रस्त शेतकर्याला शासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी देखील गावकर्यांनी केली आहे.
Comments