न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी कधीच आटापिटा केला नाही
घनश्याम शेलार यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण
श्रीगोंदा । वीरभूमी- 01-Sep, 2021, 12:00 AM
1986 सालापासून कुकडी-घोड पाण्यासाठी सतत संघर्षशील आहे (kukadi- ghod is constantly struggling for water). शेतकरी व तालुक्यासाठी लढतांना कित्येकदा मोठी राजकीय किंमत मोजावी लागली (There was a great political cost) आहे. आत्तापर्यंत जनहिताच्या कामांसाठी आंदोलने, उपोषणे व गाडीला भोंगा लावून फिरलो आहे. केलेल्या कामांचे श्रेय जनतेनेच दिले आहे. मात्र न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी कधीच आटापिटा केला नाही.कुकडी पाणीप्रश्नासाठी जीवाचे रान करूनही तथाकथित तालुक्याचे आमदार खोटे श्रेय घेण्याच्या धडपडीत तालुक्याला ‘बबन दादांशिवाय पर्याय नाही’ स्लोगनवाले बबनराव पाचपुते (babanrav pachpute) माझ्याविषयी जनतेत चुकीच्या पद्धतीने वावड्या उठवत आहेत. खरे आणि खोटे जनताच ठरवेल, अशी भावनिक साद राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) प्रदेश उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी श्रीगोंदा येथे बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) घातली.
येडगाव धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्याची मागणी, खरिपाच्या आवर्तनात संजय मामा शिंदे, रोहित पवार यांच्याशी चर्चा करून विसापूर धरण भरण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन पाणी सोडले. परंतु श्रेय घेण्याच्या धडपडीत आमदार पाचपुते यांनी वर्तमानपत्र व समाजमाध्यमांवर बातम्या पसरवून जाहिराबाजी केल्याने जलसंपदा खात्याने आवर्तन बंद केले. कालवा सल्लागार समितीवर सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यातील खासदार, आमदार, लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष असतात.
मीही समितीवर आहे पण प्रत्येक गोष्टीला मलाच का जबाबदार धरतात? वावड्या पसरवणारेही समितीवर आहेतच की ते का बोलत नाहीत? आमदार पाचपुते सत्तेवर असताना पाणी आल्यावर माझ्याचमुळे आले असा डंका पिटतात. मात्र पाण्याची अडचण आल्यावर विरोधकांवर खापर फोडतात. ही कपटनीती जनता पुरेपूर ओळखून आहे. असे टीकास्त्र शेलार यांनी पाचपुते यांच्यावर डागले.
शेलार म्हणाले की, श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सुरू होताच बंद झाले. पण पाऊस थांबल्याने जलसंपदा विभागाने आवर्तन रोखले. पाऊस होणे, नाही होणे हे माझ्या हातात थोडेच आहे. 25 ऑगस्टला पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर तात्काळ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलून माणिकडोह मधून एक टीएमसी पाणी काढल्यास आवर्तन होईल असे त्यांना सांगितले. पण पुणे जिल्ह्यातील आमदारांनी भविष्यातील पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन माणिकडोह मधून पाणी काढण्यास विरोध केल्यामुळे आवर्तन होऊ शकले नाही, असे शेलार यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतीची घोषणा गेल्या चाळीस वर्षांपासून पाचपुते करत आहेत. पालकमंत्री असतांना 20-20 व्हिजनच्या घोषणेचे भजन झाले. फक्त बनवाबनवी, घोषणाबाजी करून आत्तापर्यंत लोकहिताचा एकही निर्णय न घेणारे पाचपुते फक्त न केलेल्या कामांचे श्रेय घेण्याची धडपड नेहमी करत आहेत. असा टोला शेलार यांनी पाचपुते यांना लगावला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, संजय आनंदकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब खेतमाळीस, फिरोज जकाते, मोहन भिंताडे, बाळासाहेब शेलार उपस्थित होते.
IcpfCSvwsP