केडगाव येथील धक्कादायक घटना
अहमदनगर । वीरभूमी- 06-Sep, 2021, 12:00 AM
कर्जाला कंटाळून 10 वर्षाच्या मुलीसह पती-पत्नीने आत्महत्या (Husband and wife commit suicide with daughter) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ही घटना केडगाव (kedgaon) परिसरातील अर्थवनगर येथे घडली. या दुदैवी घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळावर एक चिठ्ठी आढळून आली आहे (A note was found at the scene).
घटनेची माहिती समजताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेतील मयताची नावे मैथिली संदीप फाटक (वय 10 वर्षे), संदीप दिनकर फाटक (वय 45 वर्षे) व किरण संदीप फाटक (वय 32 वर्षे) अशी नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, केडगाव उपनगरातील अर्थव नगर येथे राहणार्या संदीप फाटक यांनी पत्नी, मुलीसह आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती कळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि. राकेश माणगावकर यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचानामा केला. दरम्यान घटनास्थळावर एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. एकाच कुटुंबातील दहा वर्षाच्या मुलीसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
काही दिवसापासून फाटक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. यामुळे ही आत्महत्या कर्जाला कंटाळून केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर पंचानामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
Comments