अहमदनगर । वीरभूमी- 14-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी होत असतांनाच आज एकुण आकडेवारीचा स्फोट झाला आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात तब्बल 953 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे वाढत्या आकडेवारीबरोबरच चिंताही वाढली आहे.
सोमवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट झाल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेरचा आकडा 186 वर पोहोचला आहे. त्या पाठोपाठ पाथर्डी तालुक्याची आकडेवारीही 106 वर गेली आहे. त्यानंतर पारनेर, श्रीगोंदा, राहाता, नेवासा, अकोले असा क्रमांक लागतो.
आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 293, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 363 तर अँटीजेन चाचणीत 297 असे 953 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 186, पाथर्डी 106, पारनेर 91, श्रीगोंदा 73, राहाता 62, नेवासा 59, अकोले 58, कर्जत 52, राहुरी 46, नगर ग्रामीण 43, नगर शहर 41, शेवगाव 40, जामखेड 29, कोपरगाव 23, श्रीरामपूर 23, इतर जिल्हा 20, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments