भेसळयुक्त दूध तयार करण्याचे साहित्य पकडले
अकोले । वीरभूमी - 22-Sep, 2021, 12:00 AM
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरातील जांभळे रोड येथील दूध संकलन करणार्या योगेश धोंडिभाऊ चव्हाण याचे घरी व दुध संकलन केंद्रावर अकोले पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी सयुंक्त रित्या छापे टाकले. दुधात भेेेसळ करत असतांना त्यास रंगेहात पकडले. यावेळी भेसळयुक्त दूध बनविण्याचे दोन्ही अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत.
या धडक कारवाईत एकूण 80 हजार 670 रुपयांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामुळे दूध भेसळ करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा परिसरातील जांभळे रोड, ब्राम्हणवाडा येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन चव्हाण याचे घरी आज बुधवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे व त्यांचे पथक, अकोलेचे प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी. बी. हांडोरे यांच्या सयुंक्त पथकाने छापा मारला. तेथे 700 रुपयांचे 28 लिटर बनावट दूध, दुधामध्ये भेसळ करण्यासाठीचे 2025 रुपयांचे 15 लिटर लिक्विड व 52 हजार 432 रुपये किंमतीच्या दोन प्रकारच्या पावडर 371 किलो असा एकूण 55 हजार 720 रुपयांचे बनावट दूध बनविण्याचे साहित्य जप्त केले.
तसेच त्याचे मालकीचे मे. संघ केंद्र शिंदेवाडी, येथे तयार केलेले 24 हजार 950 रुपये किंमतीचे 998 लिटर दूध असे एकूण 80 हजार 670 रुपयांचे भेसळीचे दूध व साहित्य जप्त केले आहे.तेथून तपासणीसाठी नमुने घेऊन राहिलेले सर्व दुधाचा साठा नष्ट केला आहे.
यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी ताब्यात घेतले. या नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न व सुरक्षा अधिकारी श्री. पवार यांनी दिली.
ही धडक कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी. बी. हांडोरे, पो. ना. बाबासाहेब बढे, विठ्ठल शरमाळे, रवींद्र वलवे, गोविंद मोरे, पो.कॉ. गणेश शिंदे, राहुल क्षीरसागर व अन्न व औषध अधिकारी राजेश बढे, पवार, सूर्यवंशीयांनी केली आहे.
YEZOgmuFpSlXxqP