संगमनेरची चिंता कायम । इतर तालुके 53 च्या आत
अहमदनगर । वीरभूमी- 23-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या एकुण बाधितांची संख्या घटली असून काही अंशी दिलासा मिळाला आहे. आज गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 630 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर 104 तर पारनेर 53 दुसर्या क्रमांकावर तर नेवासा व राहाता (प्रत्येकी 51) तिसर्या स्थानावर आहे. बुधवारच्या तुलनेत आज आढळलेल्या बाधितांमध्ये घट झाली आहे.
आज गुरुवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 111, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 279 तर अँटीजेन चाचणीत 240 असे 630 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 104, पारनेर 53, नेवासा 51, राहाता 51, श्रीगोंदा 49, श्रीरामपूर 46, कर्जत 43, अकोले 36, नगर ग्रामीण 33, शेवगाव 33, पाथर्डी 31, राहुरी 27, जामखेड 21, नगर शहर 19, इतर जिल्हा 16, कोपरगाव 13, भिंगार 03, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments