अहमदनगर । वीरभूमी- 26-Sep, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा काही गेल्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आज रविवार दि. 25 रोजी जिल्ह्यात एकुण 762 कोरोना बाधित आढळले.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच असून 152 कोरोना बाधित आढळले आहेत. दुसर्या स्थानावर पारनेर 95 तालुका असून तिसर्या स्थानी श्रीगोंदा 80 तालुका आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत नसल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 176, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 358 तर अँटीजेन चाचणीत 228 असे 762 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 152, पारनेर 95, श्रीगोंदा 80, राहाता 70, कर्जत 61, शेवगाव 48, नगर ग्रामीण 40, नेवासा 39, नगर शहर 32, अकोले 28, पाथर्डी 26, श्रीरामपूर 26, राहुरी 23, जामखेड 17, इतर जिल्हा 14, कोपरगाव 09, भिंगार 01, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.
कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
Comments