सावधान ः जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडणार
अहमदनगर । वीरभूमी- 29-Sep, 2021, 12:00 AM
दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस होत असल्याने सर्वच्या सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील धरणेही ओव्हरफ्लो झाल्याने ओव्हरफ्लोचे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे.
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांवर गेल्याने आज बुधवारी सकाळी 11 वाजता 18 दरवाजे उघडले जाणार आहेत. यामुळे प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाने दाणादाण केली आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत तर काही धरणे ओव्हरफ्लोच्या मार्गावर आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडी, आढळा आदी धरणासह नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यातच हवामान विभागाने आज पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
धरणे ओव्हरफ्लो झाल्याने वरील धरणाचे पाणी जायकवाडी धरणात पोहोचत आहे. यामुळे आज बुधवारी सकाळी जायकवाडी धरणातील पाणीसाठ 92 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे खबरदारी म्हणुन जायकवाडी धरणातून आज बुधवार दि. 29 रोजी 18 दरवाजा उघडले जाणार असून गोदावरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Comments