ग्रामसेवकाच्या पत्नीने दिली फिर्याद
श्रीगोंदा । वीरभूमी- 04-Oct, 2021, 12:00 AM
तालुक्यातील खांडगाव-वडघुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यात उडी घेऊन आत्महत्या केली होती. तब्बल आठ दिवसांनी मृतदेह मिळून आल्यानंतर पत्नी मनिषा गवांदे यांच्या फिर्यादीवरून खांडगाव-वडघुलचे उपसरपंच राम घोडके व आनंदा शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
सौताडा धबधब्याजवळ गवांदे यांची बॅग, आयकार्ड, दुचाकी आढळून आली होती. मात्र मृतदेह सापडला नव्हता. आठ दिवसापासून मृतदेहाचा शोध सुरू होता. अखेर आठ दिवसानंतर मृतदेह सापडल्यानंतर शनिवार दि. 2 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव-वडघुल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (जि. बीड) येथील धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली होती. धबधब्याच्या शेजारी गवांदे यांचे आयकार्ड, बॅग व मोटारसायकल आढळून आली होती. मात्र मृतदेह आढळून आला नव्हता. अखेर आठदिवसानंतर गवांदे यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या पत्नी मनिषा गवांदे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत खांडगाव - वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासाला कंटाळून पती गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप ग्रामसेवक यांची पत्नी मनीषा गवांदे यांनी केला आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या वीस दिवसांपासून उपसरपंच राम घोडके व ग्रामपंचायत सदस्या सुनंदा शिंदे यांचा मुलगा आनंदा शिंदे हे दोघे मिळून वन खात्याच्या जमीनीवर अतिक्रमण केलेल्या 150 घरांची नोंद लावण्यासाठी जबरदस्तीने ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव आणत होते. आमच्या पद्धतीने कामकाज करा अन्यथा तुमची नोकरी घालवून निलंबित करून पेन्शन सुविधा बंद करण्याची धमकी दिली होती.
या सर्व त्रासाला कंटाळून ग्रामसेवक गवांदे यांनी आत्महत्या केली आहे. पत्नी मनीषा गवांदे यांनी ग्रामसेवक पतीच्या गावातील उपसरपंच राम घोडके व ग्रामपंचायत सदस्य यांचे चिरंजीव आनंदा शिंदे करणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
झुंबर गवांदे यांच्या आत्महत्येनंतर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन केले. मात्र प्रशासकीय व गावाचे लोकसेवक सरपंच व सदस्यांना एकाच तराजूत मोजण्याचे काम मात्र हिरीरीने पार पडले. एका उपसरपंचाची चूक सगळ्या तालुक्याला भोगावी लागली. गेले काही दिवस मढेवडगाव येथील ग्रामविकास अधिकारी महत्त्वाचे दफ्तर घेऊन गायब आहेत. व त्यांच्याशी संपर्क साधला असता प्रत्येकाला धमकी देत आहेत. कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांनाही प्रशासनाने जाब विचारला पाहिजे ही सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.
Comments