ऑनलाईन दर्शनासाठी या लिंकवर आपले नाव नोंदवावे
पाथर्डी । वीरभूमी- 07-Oct, 2021, 12:00 AM
जिल्ह्यासह राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धांस्थान असलेल्या श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर व सौ. आरती कुर्तडीकर यांच्या हस्ते मंत्रोपचाराच्या जयघोषात विधिवत व पारंपरिक घटस्थापना करण्यात आली.
भाविकांनी ऑनलाईन दर्शनासाठी https://renukamatamandir.in/pass_generation/pass-entry.php
या साईटवर जावून नोंदणी करावी. दररोज फक्त 5 हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नियमावली तयार करून मंदीरात फक्त देवीच्या दर्शनासाठी परवानगी दिली आहे. या आदेशानुसार ऑनलाइन पासद्वारे भाविकांनी नियमांचे पालन करत मोहटादेवीचे दर्शन घेतले. गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेले मंदिर दर्शनासाठी खुले केल्यामुळे भाविकांत उत्साहाचे वातावरण होते.
काल शेकडो गावच्या तरुण मंडळांनी देवीच्या पायथ्याशी दर्शन घेत मशाली पेटवून वाजत गाजत पायी जात आपआपल्या गावी ज्योत प्रज्वलित करून घटस्थापना केली. प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी खुले केल्याने भाविकांमधुन समाधान व्यक्त होत आहे.
मोहटा देवस्थानने भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक ती यंत्रणा उभी केली आहे. दर्शनासाठी भाविकांनी https://renukamatamandir.in/pass_generation/pass-entry.php येथे ऑनलाईन नोंदणी करून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
मोहटादेवी परिसरात झालेल्या पावसाने मंदिर परिसर निसर्गाच्या मनमोहक रुपाने नटला असल्याने दिवसा तर मंदिरावर लावण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने रात्री खुलुन दिसत आहे.
ICRYOnDGQohxM