अहमदनगर लाचलुचपत विभागाची कारवाई
अहमदनगर । वीरभूमी- 20-Oct, 2021, 12:00 AM
तक्रारदार व त्यांचा मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणुन महानगर पालिकेकडे केलेल्या कामाची बिले मंजूर करून तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात मनपाचे मुख्य लेखाधिकारी यांनी 25 हजाराची लाच मागितली.
तक्रारदार यांच्याकडून यातील 15 हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची संमती दर्शविल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय 52, रा. दिल्ली गेट, मानकर गल्ली, अहमदनगर) यांच्यावर तोफखान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
याबाबत समजलेली हकीगत अशी की, तक्रारदार व त्यांचा मावसभाऊ यांनी ठेकेदार म्हणुन महापालिकेकडे यांच्याकडे केलेल्या कामांची बिले मंजूर करून तक्रारदार यांना चेक अदा केलेच्या मोबदल्यात मनपाचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर यांनी तक्रारदार यांचेकडे 25 हजार रुपयांची मागणी केली होती.
यामुळे तक्रारदार यांनी दि. 7 ऑक्टोबर रोजी अहमदनगर लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याच दिवशी आरोपी लोकसेवक आरोपी मानकर यांनी लाच मागणी पडताळणीमध्ये तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपयांची मागणी करून 15 हजार रुपये स्विकारण्याची संमती दर्शवली म्हणुन आज दि. 20 रोजी लोकसेवक आरोपी प्रवीण गोपाळराव मानकर याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात रजि. नं. 924/2021, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आरोपी मानकर याला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी अपर पोलिस अधीक्षक सतिश भामरे, अहमदनगर विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. पुष्पा निमसे, पोनि. प्रशांत सपकाळे, पोहवा. संतोष शिंदे, पोना. रमेश चौधरी, विजय गंगुल, पो. अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चापोहवा. हारुन शेख, पोना. राहुल डोळसे यांच्या पथकाने केली.
कोणत्याही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
WyNxnzjDroeTaGQ