अहमदनगर । वीरभूमी- 25-Oct, 2021, 12:00 AM
आज अहमदनगर जिल्ह्याची आकडेवारी प्रथमच शंभरच्या आत आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळत असून जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसत आहे.
आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी 97 वर आली आहे. तसेच पाथर्डी तालुक्यात प्रथमच कोरोना बाधितांचा आकडा शुन्यावर आला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळत आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहाता पहिल्या क्रमांकावर असला तरी येथील आकडा 17 वर आला आहे. त्या पाठोपाठ नेवासा 12, पारनेर 11, श्रीगोंदा 10 तर इतर तालुके 7 च्या आत आहेत. नेहमी पहिल्या क्रमांकावर असलेल्या संगमनेरची आकडेवारी आज 6 वर आली आहे.
काल रविवार पर्यंत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 53 हजार 502 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी तब्बल 3 लाख 45 हजार 115 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना तब्बल 7 हजार 5 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 384 एवढी झाली आहे.
आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 14, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 65 तर अँटीजेन चाचणीत 18 असे 97 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 17, नेवासा 12, पारनेर 11, श्रीगोंदा 10, नगर शहर 7, इतर जिल्हा 7, कोपरगाव 6, संगमनेर 6, शेवगाव 6, नगर ग्रामीण 4, राहुरी 3, अकोले 2, कर्जत 2, भिंगार 1, जामखेड 1, मिलटरी हॉस्पिटल 1, श्रीरामपूर 1 असे कोरोना बाधित आढळून आले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा प्रथमच शंभरच्या आला आहे. मात्र तरीही नागरिकांनी हुरुळून न जाता शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत कोरोनाला हरवावे, असे आवाहन केले आहे.
FnWptNREYJujBcCb