बोधेगाव । वीरभूमी- 31-Oct, 2021, 10:32 AM
सप्टेंबर महिण्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. घुले यांच्या प्रयत्नातून शेवगाव तालुक्यातील 79 गावांतील 39 हजार 509 शेतकर्यांना 16 कोटी 35 लाख 40 हजार रुपये मदतनिधी मंजूर झाला आहे.
यातील 12 गावांतील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी याद्या तयार करण्यात आल्या असून उर्वरीत गावांनाही दिवाळी अगोदर मदत मिळण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करत आहे. या मदतीबद्दल सभापती डॉ. क्षितीज घुले यांचे लाभधारकांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.
शेवगाव तालुक्यातील अतिवृष्टीने पिकांची दाणादाण उडवत हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. परंतु जगाचा पोशींदा जगला पाहिजे या उद्देशाने कर्तव्यदक्ष सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी त्यावेळी देखील मोठ्याप्रमाणात निधीची उपलब्धता करून शेतकर्यांना आधार देण्याचे काम केले होते.
चालु वर्षातील खरीप हंगामाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात शेवगाव तालुक्यातील बहुतांशी गावात पावसाने हाहाकार माजवत पिकांची नासाडी केली होती. अतिवृष्टीने वरूर, भगूर येथील नंदीनी नदी तर कांबी येथील नदीने रौद्ररुप धारण करत गावाला वेढा दिला होता. यामध्ये घरादारांसह शेती आणि मुक्या जनावरांची प्राणहानी झाली होती.
यावेळी सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत शेतकर्यांना दिलासा देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. दरम्यान नुकसानग्रस्ताना मदत मिळुन देण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. याचीच फलनिष्पत्ती म्हणून शेवगाव तालुक्यातील तब्बल 79 गावांतील 39 हजार 509 शेतकर्यांना 16 कोटी 35 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यापैकी तालुका महसूल प्रशासनाने 12 गावांच्या याद्या तयार केल्या असून इतर गावांना मदत वाटपासाठी याद्या तयार करण्यात येत आहे. याद्या तयार केलेल्या गावांमध्ये शेवगावसाठी (1 कोटी 60 लाख 59 हजार), वडुले बु ॥ (27 लाख 73 हजार), खरडगाव (52 लाख 74 हजार), जोहरापुर (3 लाख 52 हजार 250), खामगाव (1 लाख 13 हजार 500), आखेगाव ती.(28 लाख 72 हजार 200),
आखेगाव डोंगर-(12 लाख 8 हजार 700), वरुर बु. (15 लाख 14 हजार 900), वरुर खु. (75 लाख 56 हजार), भगुर (37लाख 37हजार 800), कांबी (1 कोटी 19 लाख 23 हजार 900), गायकवाड जळगाव (56 लाख 14 हजार 200), असे एकुण 6 हजार 681 खातेदारांच्या 5 हजार 743.56 हेक्टर क्षेत्राकरीता 5 कोटी 89 लाख 99 हजार 450 रुपयांचा निधी वितरीत केला आहे.
शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्नशिल होतो. शेतकर्यांच्या पाठीशी आजही आहे आणि येथून पुढे देखील राहाणार आहे. शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून तालुक्यासाठी सर्वात जास्त मदतनिधी मिळाला आहे. नुकसानग्रस्तांना मदत वाटपासाठी याद्या तयार करण्यात येत आहेत. दिवाळी अगोदरच नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत प्रशासनाला सुचना केल्या असल्याचे पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांना सांगितले.
QyKhtcSWwDUX