अहमदनगर । वीरभूमी- 12-Nov, 2021, 02:30 PM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत गुरुवारी वाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी कमालीची घट झाली आहे. आज जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची आकडेवारी ही 8 च्या आत असून तब्बल सहा ठिकाणचा आकडा शुन्यावर आहे.
कमी झालेल्या आकडेवारीमुळे नागरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये भिंगारसह कर्जत, संगमनेर, मिलटरी हॉस्पिटल, इतर राज्य व इतर जिल्हा येथील आकडेवारी शुन्यावर आली आहे.
काल गुरुवारपर्यंत जिल्ह्यातील अॅक्टीव रुग्ण संख्या 632 वर आली आहे. यामुळे नगरकरांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळणे गरजेचे आहे.
आज शुक्रवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 6, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 45 तर अँटीजेन चाचणीत 9 असे 60 कोरोना बाधित आढळून आले.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 8, शेवगाव 8, राहुरी 7, श्रीगोंदा 7, नगर ग्रामीण 6, नगर शहर 5, नेवासा 5, श्रीरामपूर 5, पारनेर 3, पाथर्डी 3, अकोले 1, जामखेड 1, कोपरगाव 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर भिंगार, कर्जत, मिलटरी हॉस्पिटल, इतर जिल्हा, इतर राज्य व संगमनेर येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Nice local news