नेवासा । वीरभूमी- 13-Nov, 2021, 02:08 PM
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना प्रशासनाने यावर्षी गाळपासाठी येणार्या उसाला 2411 रुपये प्रतिटानाप्रमाणे एफआरपी जाहीर केली आहे. याबाबत कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडूरंग अभंग यांनी घोषणा केली आहे.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यावर्षीची एफआरपी जाहीर करावी म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाशी चर्चा करून निवेदन दिले होते. यावेळी झालेल्या चर्चेत साधक बाधक चर्चा होऊन कारखान्याच्या वतीने 2411 रुपये प्रमाणे एफआरपी जाहीर केली.
यावेळी कारखान्याचे संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले, कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग व स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, बाळासाहेब फटांगरे, संतोष गायकवाड, संदीप मोटकर, प्रशांत भराट, रावसाहेब लवांडे, अशोक पावसे, भाऊ बैरागी, मच्छिंद्र आर्ले, माऊली मुळे, चंद्रकांत सरगड, नारायण पायघन, अशोक भोसले, अमोल देवढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी बैठकीत यावर्षी गाळपासाठी येणार्या ऊसाची एफआरपी जाहीर करावी, वजन काटा, कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यास प्राधान्य द्यावे, अतिवृष्टी व पूराने नुकसान झालेल्या ऊसाची प्राधान्याने तोडणी करावी. ऊस वाहतूक करणार्या ट्रक्टर चालकांना टेप रेकॉर्डचा आवाज कमी ठेवण्याबाबत सुचना द्याव्यात. तसेच ऊस वाहतूक करणार्या वाहनाच्या पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर लावावे, अशा मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी कारखान्याच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या मान्य करत या हंगामात 2411 रुपये प्रमाणे एफआरपी जाहीर केली. याबाबतची घोषणा कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आ. पांडुरंग अभंग यांनी केली.
एफआरपीची घोषणा करताच स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादकांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
jobDSFBVkpPE