करंजी दरोड्यातील दोघे जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर । वीरभूमी- 16-Nov, 2021, 05:45 PM
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील खुनासह दरोड्यातील सराईत दोघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. बेर्या ऊर्फ किशोर रायभान भोसले (वय 25) व परवीन उर्फ प्रवीण उर्फ प्रतीभा नवनाथ भोसले (वय-32, दोघे रा. साकेगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर पाथर्डी तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या काळात म्हणजे दि. 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील अपूर्वा पेट्रोल पंपासमोर राहणारे भावले यांच्या घरावर दरोडा पडला होता. भावले पती-पत्नी घरामध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचे घरात प्रवेश करून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचे सोन्याचे दागिने बळजबरीने तोडून घेऊन गेले.
या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले यांना जबर मारहाण झाल्याने त्यात ते मयत झाले. त्याबाबत शांताबाई गोपीनाथ भावले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 394, 397, 452, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, यांनी तात्काळ घटने ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन करून समांतर तपास करणेबाबत सूचना दिल्या. सदर गुन्हयांचा समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्वतंत्र पथके तयार करुन सदर गुन्हयांचे अनुषंगाने काही उपयुक्त माहिती मिळविण्याच्या सुचना दिल्या.
सदर गुन्हयांचा समांतर तपास करताना पोनि. कटके यांना सदरचा गुन्हा उमेश रोशन भोसले (रा. साकेगाव) याने त्याचे साथीदारांसह केला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. यावरुन पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथून उमेश उर्फ किसन रोशन भोसले (वय-24, रा. साकेगाव, ता. पाथर्डी) यास अतिशय शिताफीने ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन वर नमूद गुन्ह्याविषयी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने बेर्या ऊर्फ किशोर रायभान भोसले (वय-25), परवीन ऊर्फ प्रवीण ऊर्फ प्रतीभा नवनाथ भोसले (वय-32, दोघे रा. साकेगाव ता. पाथर्डी) व त्यांचा एक साथीदारासह (फरार) अशांनी मिळून केल्याची माहिती समजली.
त्याप्रमाणे वरील आरोपींचा साकेगाव व निंबेनांदुर गाव परिसरात शोध घेतला. त्यानंतर दोघांना गजाआड करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सपोनि. गणेश इंगळे, पोसई. सोपान गोरे, पोहेकॉ. सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेटेकर, विश्वास बेरड, दिनेश मोरे, पोना. संतोष लोढे, ज्ञानेश्वर शिंदे,
शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संदीप दरंदले, सुरेश माळी, विशाल दळवी, पोकॉ. मच्छिद्र बड़े, प्रकाश वाघ, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, रोहीत येमूल, जालिंदर माळी, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहीदास नवगिरे, विनोद मासाळकर, कमलेश पाथरुट, मयुर गायकवाड व चालक पोहेकॉ. बबन बेरड, उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर यांनी ही कारवाई केली.
XbuWBmoZhRVQKUYO