आजपासून पाथर्डीत रंगणार उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पाथर्डी । वीरभूमी- 20-Nov, 2021, 10:05 AM
राज्य कुस्तिगीर परिषद, जिल्हा तालीम संघ व संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने एम.एम. निर्हाळी विद्यालयाच्या प्रांगणात उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन दि. 20 व 21 नोव्हेंबर रोजी करण्यात आले असल्याची माहिती अॅड. प्रताप ढाकणे यांनी दिली.
यावेळी ढाकणे म्हणाले, पाथर्डीत उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे व जळगाव येथील नामवंत पैलवान सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा शुभारंभ आमदार निलेश लंके, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तर पारितोषोक वितरण दिनांक 21 रोजी सायंकाळी आमदार रोहित पवार यांच्या उपस्थित होणार आहे.दोन दिवस सहभागी स्पर्धेकांची निवासी व्यवस्था करण्यात आली असून दोन्ही दिवस राज्यातील नामवंत खेळाडू हजेरी लावणार आहेत.
ही स्पर्धा 48 ते 84 किलो खुल्या वजनी गटात तसेच 84 ते 120 किलो वजनी गटात खुल्या होणार आहेत. खुल्या गटातील विजेत्यास 51 हजार रुपये व चांदीची गदा दिली जाणार आहे. तसेच इतरही अनेक पारितोषिके विविध गटातील स्पर्धकांना दिली जाणार आहेत.
पाथर्डीत पहिल्यांदाच कुस्ती केसरी स्पर्धा आयोजित केली असल्याने तालुक्यातील नागरिकांनी कुस्त्या पाहण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, तालुका सचिव पप्पू शिरसाट यांनी केले आहे.
दोन दिवस या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील नामवंत पैलवान आपली उपस्थिती लावणार आहेत. दिनांक 20 रोजी दुपारी स्पर्धक खेळाडूंची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
VbalBfNILFQJm