पाथर्डी । वीरभूमी- 22-Nov, 2021, 12:27 AM
पाथर्डी येथे झालेल्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती चषक स्पर्धेत नगरचा सुदर्शन कोतकर याने अंतिम लढतीत बाजी मारत उत्तर महाराष्ट्र केसरी पदांची गदा पटकावली.
अंतिम कुस्तीची लढत सुदर्शन कोतकर (नगर) विरुध्द बाळू बोडखे (नाशिक) यांच्यात लाल मातीच्या आखाड्यात झाली. एक तासांपेक्षा ही जास्त वेळ चाललेल्या या निकाली कुस्तीत कोतकर याने घुटना डावावर बोडखे याला चितपट केले. कुस्त्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पंढरपूर येथील शंकर आण्णा पुजारी यांनी स्पर्धेचे सुंदर, अचुक, माहीतीपूर्ण असे समालोचन करुन प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे पै. राजेंद्र शिरसाठ, संचालक ऋषीकेश ढाकणे, अॅड.सिध्देश ढाकणे, बाजार समितीचे संचालक गहिनीनाथ शिरसाठ,
माजी सभापती काशीनाथ लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सीताराम बोरुडे, बाळासाहेब घुले, नगरसेवक बंडू बोरुडे, डॉ.दीपक देशमुख, हुमायुम आतार, जिल्हा फर्टिलायझर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश मुनोत, उद्योजक कपील अग्रवाल, योगेश रासने, बबलू शिरसाठ, देवा पवार, अक्रम आतार, विक्रम बारवकर, शिवाजी बडे, दिगंबर ढवण आदी उपस्थित होते.
सकाळ ते संध्याकाळपर्यंत सहा गटात कुस्त्या रंगल्या होत्या. सर्व कुस्त्या मॅटवर घेण्यात आल्या.शेवटची उत्तर महाराष्ट्र कुस्ती चषक स्पर्धेची कुस्ती लाल मातीत बेमुदत निकाली लावण्यात आली होती.
यामधील विजयी मल्लास स्पर्धेचे आयोजक अॅड.प्रताप ढाकणे यांच्या हस्ते चांदीची गदा व 51 हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर उपविजयी मल्ल बाळू बोडखे याला 31 हजार रुपये व चषक तर तृतीय विजेता अनिल ब्राम्हणे याला 21 हजार रोख व चषक देण्यात आले.
dIutQiFCLlzeS