येळपणे येथील मन हेलावणारी घटना
श्रीगोंदा । वीरभूमी- 22-Nov, 2021, 10:15 PM
श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील 11 वर्षाच्या अभिषेक बाळू लकडे या शाळकरी मुलाचा विहिरीत तोल जाऊन पडल्यामुळे दुर्देवी अंत झाला आहे. दोन वर्षांपूर्वी अभिषेकच्या आईचा मृत्यू झाला होता तर सोमवारी अभिषेकवर काळाने घाला घातल्याने लकडे परिवारावर दुःखाचा आघात झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण येळपणे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, येळपणे गावातील ठाणगेवाडी येथील अभिषेक बाळू लकडे (वय 11 वर्षे) हा विहिरीच्या कडेला असलेल्या बोराच्या झाडाला बोरे काढण्यासाठी गेला असता त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. पाण्यात पडल्याने त्याचे दुर्देवी निधन झाले. तो बराच वेळ घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता अभिषेकची विहिरीच्या कडेला चप्पल दिसून आली. विहिरीत शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह सापडला.
दुपारी साडेबारा वाजता अभिषेकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक हा येळपणे येथील श्री खंडेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता सहावी मध्ये शिकत होता. तो अत्यंत हुशार होता. त्याचा स्वभाव चांगला होता.
अभिषेकचे वडील हे शेतकरी आहेत. अभिषेकच्या आईचे दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे लकडे कुटुंबावर दुहेरी आघात झालेला आहे. तसेच येळपणे गावचे सरपंच किरण धावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर, कुकडी कारखाना संचालक आबा पाटील पवार,
ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब पवार, प्रा. लकडे सर, खंडेराव शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक पवार सर, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, अभिषेकचे सर्व शिक्षक वृंद, अनेक जणांनी लकडे कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आहे.
छान