पाथर्डी । वीरभूमी- 25-Nov, 2021, 10:33 PM
मागील दिड वर्षांपासून कोरोनामुळे देवस्थान बंद होते. वर्षंभरात मंदीर बंद असल्याने कामाचा वेग वाढवता आला नाही. विकास कामाबाबत सर्वच विश्वस्तांचे एकमत व एकजूट असून निर्णय घेतांना कोणतेही मतभेद नसतात. त्यामुळे आगामी काळात मढी येथील कानिफनाथ देवस्थानया तीर्थक्षेत्राचा लवकरच कायापालट करु. राज्यात मढी हे आदर्श गाव व देशात आदर्श तीर्थक्षेत्र म्हणूनच ओळखले जाईल, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष तथा सरपंच संजय मरकड यांनी दिली.
श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाचा वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या संध्याताई आठरे या होत्या.
यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, युवा नेते रवींद्र वायकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, कोषाध्यक्ष बबन मरकड, सचिव विमलताई मरकड, सहसचिव शिवजीत डोके, विश्वस्त डॉ. विलास मढीकर, भाऊसाहेब मरकड, शामराव मरकड, तान्हाजी ढसाळ, मच्छिंद्रनाथ देवस्थानचे सचिव बाबासाहेब म्हस्के, ग्रामसेवक विठ्ठल राजळे, तलाठी पल्लवी बर्हाटे, माजी सरपंच भिमराज मरकड, विजयाताई शिदोरे, अंबादास आरोळे, सुधीर मरकड, नवनाथ मरकड, भानूविलास मरकड, बाळासाहेब मरकड, एकनाथ मरकड, शैलेंद्र बोदार्डे, भारत मरकड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंगल कार्यालय, स्वर्गरथ, वाहनतळ व विविध विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. इनामी जमिनीतील इतर हक्काचे नाव कमी करण्यासाठी देवस्थान समितीला लेखी दिले आहे. त्या ग्रामस्थांचे व गुणवंत कर्मचारी यांचा देवस्थान समितीच्यावतीने गौरव करण्यात आला. मढी येथील विकास कामे झपाट्याने होत असुन ग्रामस्थांनी विश्वस्तांच्या पाठीशी उभे रहावे.
विश्वस्त मंडळ धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कामातही अग्रेसर असुन कोरोना काळात समितीने समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संध्याताई आठरे व्यत केल़े.
उपाध्यक्ष गवारे यांनी, मंगल कार्यालय, मढी-मायंबा रोप वे आदी विकास कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव शिवजीत डोके यांनी केले. सूत्रसंचालन शरद कुटे यांनी केले तर नवनाथ मरकड यांनी आभार मानले.
eqRobAaPcht