टोमॅटोच्या किंमती आणखी दोन महिने चढ्या राहणार
मुंबई । वीरभूमी- 27-Nov, 2021, 09:08 AM
अतिवृष्टीमुळे भाज्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून सध्या टोमॅटोच्या वाढलेल्या किंमती आणखी दोन महिने चढ्या पातळीवर राहतील, असा अंदाज क्रिसिल रिसर्चने शुक्रवारी व्यक्त केला.
प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्य असलेल्या कर्नाटकातील परिस्थिती इतकी भयानक’ आहे की, महाराष्ट्राच्या नाशिकमधून भाजीपाला पाठवला जात आहे. ऑक्टोबर- डिसेंबर या कालावधीत कर्नाटकात झालेल्या अतिवृष्टीमुळे (साधारणपेक्षा 105 टक्के जास्त) उभी पिके नष्ट झाली आहेत.
आंध्र प्रदेश (साधारणपेक्षा 40 टक्के जास्त) आणि महाराष्ट्रात (22टक्के) पाऊस झाला. ही राज्ये प्रमुख पुरवठादार आहेत. परिणामी 25 नोव्हेंबरपर्यंत 142 टक्क्यांनी किंमतीत वाढ झाली आहे. जानेवारीपासून मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून कापणी नंतरचे नवे पीक बाजारात येईपर्यंत आणखी दोन महिने किंमती चढ्या पातळीवर राहतील, असे क्रिसिल रिसर्चने म्हटले आहे.
सध्या टोमॅटो 47 रुपये किलो दराने विकला जात असून नवीन आवक सुरू झाल्यानंतर भाव 30 टक्क्यांनी घसरतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि गुजरात येथे झालेल्या अतिवृष्टीचा रब्बीतील बटाटा हंगामाला फटका बसला आहे.
hGAXqYkM