नेवासा । वीरभूमी- 05-Dec, 2021, 01:55 PM
महाराष्ट्र शासनाने नुकतेच परिपत्रक काढून आधारकार्ड मधील मिसमॅच काढण्याची जबाबदारी शिक्षण विभागावर टाकली आहे. परंतु वस्तुतः आधारकार्ड वितरित करण्यार्या यंत्रणेची ती जबादारी असल्याने शिक्षण विभागावर ती टाकू नये, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हा कार्यवाह व नेवासा तालुकाध्यक्ष संजय भुसारी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात संजय भुसारी यांनी सांगितले की, शालेय रेकॉर्ड अधिकृत असताना तसेच शाळेच्या रेकॉर्ड वरूनच जे आधार कार्ड आम जनतेला महसूल विभागाच्या संबंधित यंत्रणेकडून दिले जाते त्यामध्ये शालेय विद्यार्थी देखील असतात. आधारकार्डवर आधारित संचमान्यता इत्यादी बाबी करताना अनेक विद्यार्थ्यांचे तसेच सामान्य जनता यांचे आधार अपडेट केले नसल्याने ते अनेकवेळा मिसमॅच होते. त्यामुळे ते दुरुस्त करण्याची जबाबदारी आधार कार्ड देणार्या संबंधित यंत्रणेची आहे. त्यांनी ते दुरुस्त करणे गरजेचे आहे.
असे असताना त्याची जबाबदारी शिक्षण विभागावर टाकू नये. शासनाने परिपत्रक काढून जबाबदारी झटकू नये. शासनाने काढलेल्या परिपत्रकाला जिल्हाध्यक्ष आपासाहेब जगताप, राज्य सचिव सुनील गाडगे, कार्यध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा कार्यवाह व नेवासा तालुकाध्यक्ष संजय भुसारी, जिल्हाउपाध्यक्ष सिकंदर शेख, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, नेवासा कार्याध्यक्ष रामराव काळे, उच्च माध्यमिक अध्यक्ष प्रा. गोवर्धन रोडे,
शेवगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष शेंदूरकर, सचिव तुकाराम फटांगरे, राम कर्जुले, प्रा. सोपानराव काळे, लक्ष्मीकांत नांगरे, नबाब शहा, सुरेश शेरे, प्रा. गोरक्षनाथ पाठक, कार्याध्यक्ष शेषेराव आहेर, उपाध्यक्ष गोरक्ष शिंदे, जयंत पाटील, सहसचिव सुनील पंडित, अर्जुन शिंदे, नितीन गडाख, नवनाथ साळवे, सागर बनसोडे, सुनील इंगळे, रावसाहेब कर्जुले, गंगाधर कर्डीले,
सतीश सूरसे, अमजदखान पठाण, अशोक दराडे, संजय काळे, चिंतामणी आहेर, प्रा. दळे, प्रा. सोमनाथ नाईक, प्रा. केदारनाथ आगळे, प्रा. चिंतामणी, मेहेत्रे, प्रा. राजेंद्र गवळी, प्रा. गणपत घनवट, प्रा. सुधाकर नवथर, प्रा. देविदास आंगरख, नानासाहेब घुले, शरद कराड, भाऊसाहेब दरंदले, पंढरीनाथ शेरकर, आर. एल. सातपुते, पोपट आवटे, शिवाजी मुंगसे यांनी विरोध केला आहे.
cagPTEBMtxlj