पाथर्डी । वीरभूमी- 05-Dec, 2021, 07:36 PM
पाथर्डी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी शिवशंकर राजळे यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या तालुका टीमकडे अर्थात तालुका कार्यकारिणीकडे पक्षातील कार्यकर्ते व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
आगामी वर्षात तालुक्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या कार्यकारणी निवडीला महत्त्व प्राप्त झाले होते. तसेच तालुका स्तरावर पक्षसंघटनेत कोणाला संधी मिळते याकडे ही पक्षातंर्गत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते.
पाथर्डी तालुक्यातील विविध भागातील मिरी, करंजी, तिसगाव, माणिकदौंडी, चिंचपुर, टाकळीमानुर, खरवंडी, कोरडगाव आदी विभागातील कार्यकर्ते यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जबाबदारी टाकली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली.
ढाकणे यांनी नुतन पदाधिकारी यांना शुभेच्छा देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धेय्य, धोरणे व विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकारी यांना करावयाचे आहे.
सर्वच कार्यकर्ते हे तोलामोलाचे स्पर्धेत असल्याने पदांच्याबाबत न्याय देतांना विचारपूर्वक न्याय द्यावा लागला. यामुळे बराच कालावधी गेला. तसेच पाथर्डी तालुक्यातील विभागवार कामे, समस्या यांचा अभ्यास करुन तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची भुमिका पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते यांनी घ्यावी. यावेळी खालील पदे जाहीर करण्यात आली आहेत.
उपाध्यक्ष - दिगंबर गाडे, डॉ. राजेंद्र खेडकर, जालिंदर वामन, डॉ.राजेंद्र धनगर, अंबादास डमाळे, काकासाहेब सातपुते, सरचिटणीस- महादेव आव्हाड, अनिल बंड, राजेंद्र जगताप, विष्णू बडे, अनिल ढाकणे. चिटणीस- पंडित बडे, नवनाथ पाठक, वृद्धेश्वर कंठाळी, ज्ञानदेव खेडकर, अशोक शिंदे, हुमायुन आतार.
पाथर्डी शहराध्यक्ष- योगेश रासने. युवक तालुकाध्यक्ष- महारुद्र कीर्तने. कार्याध्यक्ष- अजय पाठक, महिला आघाडी अध्यक्ष- सविता भापकर, विद्यार्थी आघाडी - शुभम वाघमारे, अल्पसंख्यांक आघाडी- अक्रम आतार, ओबीसी आघाडी- अंबादास राऊत, डॉक्टर आघाडी- डॉ.अशोक बडे, कला सांस्कृतिक आघाडी- जनार्धन बोडखे आदींची तालुका कार्यकारणीमध्ये निवड करण्यात आली आहे.
तसेच विशेष निमंत्रिता मध्ये नामदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अॅड. प्रताप ढाकणे, सौ. प्रभावती ढाकणे, बाळासाहेब ताठे, किरण शेटे, सिताराम बापू बोरुडे, बंडू पाटील बोरुडे, अॅड. अंकुशराव गर्जे आदींना स्थान देण्यात आले आहे.
hUIKVvXsWGf