पाथर्डी तालुकास्तरीय शासकीय समित्यांवर यांना मिळाली संधी
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने झाल्या नेमणुका / निवडी जाहीर होण्याअगोदर आली स्थगिती
पाथर्डी । वीरभूमी - 09-Dec, 2021, 08:42 AM
तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक वैभव चंद्रकांत दहिफळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अशासकीय सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेव कोंडीराम केळगंद्रे, मीरा रामनाथ बडे, राजेंद्र प्रल्हाद नांगरे, प्रकाश विठ्ठल शेलार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासीर शहानवाज शेख, ज्ञानदेव विठोबा जवरे, शिवाजी तात्याबा मरकड, रविंद्र शंकरराव पालवे व रुस्तुम ज्ञानदेव खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. सदर समिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने गठीत करण्यात आली असून शासनाच्या तालुकास्तरीय अन्य समित्यांच्या नेमणूकाही तहसिलदार शाम वाडकर यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाने आज घोषित केल्या.मात्र यानंतर वरीष्ठ पातळीवरून या निवडीला स्थगिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे निवडी होऊनही नियुक्ती पत्रासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या धोरणानुसार पाथर्डी तालुक्यातील विविध शासनाच्या तालुकास्तरीय समित्यांच्या पदाधिकारी निवडीच्या घोषणा आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार तहसीलदार शाम वाडकर यांनी जाहीर केल्या. समित्यांच्या पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादीचे नेते अँड. प्रताप ढाकणे यानी मंत्री मुश्रीफ यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पक्षातील कार्यकर्त्यांना त्यात संधी मिळवून दिली.
समिती व त्यातील नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे- आत्मा समिती अध्यक्षपदी आजिनाथ विश्वनाथ बडे तर अशासकीय सदस्य म्हणून पोपट दशरथ बडे, मीरा अशोक शिंदे, सुनील ताराचंद पवार, सौ. सुनीता सतिष वारगुळे, श्रीमती अनघा भाऊसाहेब वाघमारे, शुभम नारायण गर्ज, अनिल गोविंदराव साबळे व सौ. शिला लहुदेव खेडकर. रोजगार हमी योजना समिती अशासकीय सदस्य म्हणून मुरलीधर नामदेव दिनकर, सोमेश्वर मारूती देठे, अमोल भिमराव गाडे, राजेंद्र विठोबा जगताप, भाऊसाहेब धस. रामराव पुनीत चव्हाण, सौ. अनिता अनिल जाधव.
सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती अशासकीय सदस्य- शशिकांत रामचंद्र वाघमारे, महेंद्र रामकिसन सोलाट. सौ. सुनीता अशोक ढगे, सौ. योगिता बाळासाहेब ताठे, सौ. प्रमिला विलास टेमकर, सौ. संजिवनी म्हतारदेव कोरडे. सौ. शंकुतला पंडीत बड़े, विष्णु जिवडे, नवनाथ श्रीधर वाघ, अब्दुल अजीज शेख. समन्वय व पुनर्विलोकन समिती अशासकीय सदस्य म्हणून वसंत तुकाराम खेडकर, भाऊसाहेब दगडू निमसे, अमोल मिठू शेळके, गणेश केशव दिनकर, दिगंबर मोहनराव गाडे, सौ. वंदना सोमनाथ टेके.
नगरपालिकास्तरिय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समिती अशासकीय सदस्य म्हणून राजेंद्र युहान पगारे, शिवाजी दादा नन्नवरे, सौ. श्रीलेखा सागर राठोड. सौ रूपाली देविदास पवार, मुश्ताक हुसेन शेख, सौ. दिपाली विकास दिनकर, मुकुंद गोवर्धन भालसिंग, चांद हुमायुन मनियार, सचिन रमेश बजाज. राज्य विद्युत मंडळ तालुकास्तरीय सल्लागार समिती अध्यक्षपदी बंडू पाटील विठ्ठलराव बोरुडे तर अशासकीय सदस्य पदी सिताराम उत्तमराव बोरुडे, महारुद्र अंबादास कीर्तने, किशोर जिजाबा डांगे, ऋषिकेश रमेश गव्हाणे व शरद बाबासाहेब पवार.
तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती अशासकीय सदस्य म्हणून नवनाथ शिवराम चव्हाण, जुनेद मेहमूद पठाण, सौ सविता चंद्रकांत भापकर. तालुकास्तरीय दुष्काळ निवारण समिती अध्यक्षपदी बाबासाहेब उत्तम ढाकणे तर अशासकीय सदस्य म्हणून अनिल नामदेव फुंदे, सौ सिंधू पोपट बडे.
तालुकास्तरीय अवैध दारू प्रतिबंध समिती अशासकीय सदस्य म्हणून डॉ. राजेंद्र मुरलीधर खेडकर, नितीन प्रभाकर खंडागळे. मागासवर्गीय मुले मुलींकरता शासकीय अनुदानातील वस्तीगृह समन्वय समिती अशासकीय सदस्य म्हणून जालिंदर सखाराम साप्ते. तालुकास्तरीय प्राथमिक शिक्षण सल्लागार समिती अशासकीय सदस्य म्हणून सौ. शीला लहूदेव खेडकर, सुरेश साहेबराव बडे, सदानंद दिनकर दहिफळे, रफीक गुलाब शेख, सौ योगिता शिवशंकर राजळे, नंदकुमार बाबुराव डाळिंबकर. तालुकास्तरीय कुटीर ग्रामीण रुग्णालय समिती अशासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ. प्रभावती प्रतापराव ढाकणे, सौ शुभांगी विठ्ठल जगताप व सचिन मच्छिंद्र राजळे यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्वांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ड प्रतापराव ढाकणे यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देतात समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले व महाविकास आघाडी सरकारची लोकहिताची धोरणे व योजना सामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात असे म्हटले आहे.
या समित्यांच्या निवडी जाहीर होण्याअगोदरच याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या निवडी ठरल्याप्रमाणे जाहीर होणार की, नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
JEAZjynF