शेवगाव । वीरभूमी- 15-Dec, 2021, 10:46 PM
सन 2021-22 या सालातील शेवगाव तालुक्यातील 34 गावांतील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. ही अंतिम पैसेवारी 58 पैसेपेक्षा जास्त आहे.
या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. याचा शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचे उत्पादनही घटले आहे. तरही शेवगाव तालुक्यातील खरीपाच्या 34 गावांतील पैसेवारी 58 पैसेपेक्षा जास्त आली आहे.
महसूल विभागाने बुधवार दि. 15 डिसेंबर 2021 रोजी तालुक्यातील खरीपाच्या 34 गावातील पैसेवारी महसूल प्रशासनाने जाहीर केली आहे. या आकडेवारीत सर्वात कमी पैसेवारी ही बाडगव्हाणची आहे. मात्र ही पैसेवारी 58 पेक्षा जास्त आहे.
शेवगाव तालुका महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी पुढील प्रमाणे- अधोडी 60, आंतरवाली बु. 62, आंतरवाली खुर्द 59, बेलगाव 62, बाडगव्हाण 58, बोधेगाव 60, चेडेचांदगाव 59, दिवटे 61, गोळेगाव 60, हसनापूर 67, कोळगाव 66, कोनोशी 62, लाडजळगाव 61, माळेगाव ने 68, मंगरुळ बुद्रुक 67, मंगरुळ खुर्द 68, मुरमी 63, नागलवाडी 62, नजीक बाभुळगाव 67,
राक्षी 62, राणेगाव 60, सालवडगाव 66, सुळेपिंपळगाव 69, सोनेसांगवी 62, शिंगोरी 62, शोभानगर 61, शेकटे बुद्रुक 63, शेकटे खुर्द 62, सुकळी 62, थाटे 67, ठाकुर निमगाव 68, वाडगाव 68, वरखेड 62, सेवानगर 63 अशी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
AUIRDkKiyWQSP