शेटे मळ्यातील दत्त जयंती निमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात सहभाग
अकोले । वीरभूमी - 19-Dec, 2021, 10:14 PM
अकोले शहरातील शेटे मळा येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थान येथे दरवर्षी दत्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी काल्याचे किर्तनानंतर मेथीची भाजी व भाकरी अशा महाप्रसादाचे आयोजन करण्याची अनेक वर्षांपासून परंपरा आहे. तात्पुरती चुल करुन भाकरी करण्याचे काम महीला सेवेकरी मनोभावे या ठिकाणी करीत असतात.
यावर्षी या सोहळ्याला संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी अकोले येथील शेटे मळा येथील श्रीक्षेत्र दत्त देवस्थानला भेट दिली. दरम्यान महाप्रसादासाठी महिला भाकरी करत असल्याचे पाहुन नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही चुलीजवळ बसून भाकर्या भाजण्यासाठी महिलांची मदत केली.
त्यांचे समवेत अकोले नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा सौ. संगीता शेटे, मंदाताई नवले, वनिता शेटे, गीता शेटे यांच्यासह शेटे मळ्यातील महीला सहभागी झाल्या होत्या.
सौ.दुर्गाताई तांबे भाकरी भाजताना पाहून शेटे मळ्यातील महिला खूप भारावून गेल्या होत्या. सौ.तांबे या पण अतिशय या गोष्टीचा आनंद घेताना दिसत होत्या.
नेहमीच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात नेहमी असणारी धावपळीने हा आनंद घेता येत नाही. मात्र यौगायोगाने आध्यत्मिक व ग्रामीण क्षेत्रातील जीवनाचा आनंद मिळाला, याचे समाधान त्यांच्या चेहर्यावर दिसून येत होते.
अगदी ग्रामीण भागातील माहेरवासिन स्वतःच्या घरी येऊन घरातील आई, भगिनी बरोबरचा आनंदी अनुभव घेतला व साधी राहणीमान असलेल्या दुर्गाताई यांना आपल्यात बसून भाकरी भाजताना मदत करतांना पाहुन शेटे मळ्यातील महिलाही भारावून गेल्या होत्या.
GFSbNeTaDXqmhpoK