पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली । वीरभूमी - 25-Dec, 2021, 10:55 PM
देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचं संकट गडद होत आहे. मात्र घाबरुन जाण्याचे कारण नाही. सावध राहा, सतर्क राहा. नियमित मास्क लावा व जास्तीत जास्त हात धुवा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.
तसेच 15 ते 18 वर्षाच्या मुलांना सोमवार दि. 3 जानेवारी 2022 पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण तर कोरोना वारियर्स यांना 10 जानेवारी 2022 पासून बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी रात्री देशातील जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 15 ते 18 वर्षाच्या मुलांना लस देण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. मात्र जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. नियमित मास्क लावावा. वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पुढे ते म्हणाले, सोमवार दि. 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षांच्या आतील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे.
तसेच साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिसरा डोस देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात 10 जानेवारी 2022 पासून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना लढ्यात महत्वाची भुमिका बजावलेल्या कोरोना वारियर्स आरोग्य कर्मचार्यांना 10 जानेवारी 2022 पासून देण्यात येणार आहे.
भारतातील 61 टक्क्यांपेक्षापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर 90 टक्के नागरिकांना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. देशात आतापर्यंत 141 कोटी डोस देण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबतचा निर्णयाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. ओमिक्रॉनच्या लढ्यात पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे महत्वाचे योगदान राहणार असल्याचे बोलले जात आहे.
kqvmAhQS