डॉ. क्षितिज घुलेंकडून कामाला प्राधान्य देत वाढदिवस साजरा
बोधेगाव । वीरभूमी - 18-Jan, 2022, 10:49 AM
बहुतांशी नेत्यांच्या वाढदिवसाला ढोल- ताशे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर करून वाढदिवस साजरे केले जातात. परंतु शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज भैय्या घुले यांनी अवांतर खर्चाला फाटा देत कामाला प्रथम प्राधान्य देत वाढदिवस साजरा केला.त्यांच्या झालेल्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाची दिवसभर तालुक्यामध्ये चर्चा होती.
सर्वसामान्यांप्रती असणारे प्रेम, आस्था मदतीचा भाव, आजोबा स्व. मारुतरावजी घुले पाटील यांचा राजकारणातील मूलमंत्र-समाजकारण 70 टक्के आणि राजकारण 30 टक्के आणि वडील माजी आमदार नरेंद्र घुले पाटील तसेच काका माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांची प्रेरणा घेउन
पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती डॉ. क्षितिज भैय्या घुले पाटील यांनी विकास साधत असताना आपला वाढदिवस ऊसतोडणी कामगार यांना ब्लँकेट तसेच फडातील कामगारांच्या चिमुकल्यासोबत केक कापुन तसेच तालुक्यातील गावागावांत हायमॅक्स, बसस्टँड वरती प्रवाशांना आसन व्यवस्था, नेत्रदान शिबीर, वृक्षारोपण तसेच जागृत देवस्थान काशिकेदारेश्वर मंदिराकरीता पेव्हिंग ब्लॉक अशा प्रकारची मदत करून इतर खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस साजरा केला.
दरम्यान सर्वसामान्य प्रती असलेल्या अस्थेपोटी पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज भैय्या घुले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात केलेल्या मदतीची मात्र मोठ्याप्रमाणात चर्चा एकायला मिळत होती.
Comments