पाथर्डी । वीरभूमी- 19-Jan, 2022, 04:11 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले वक्तव्य निंदनिय व आक्षेपार्ह असून अत्यंत खालच्या पातळीचे आहे. या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा निषेध करत त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा पाथर्डी तालुका भाजपाच्यावतीने निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशुन ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो,’ असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले असून पटोले यांचा पाथर्डी तालुका भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
तसेच राज्य सकारने त्यांच्यावर तातडीने देशद्रोहाचा व समाजात तेढ निर्माण करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.तसेच एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असे गंभीर स्वरूपाचे वक्तव्य करतो या मागे काही षडयंत्र आहे की काय? याचा तपास ही पोलिसांनी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने तत्परता दाखवुन राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली होती. तोच न्याय नाना पटोले यांना लावुन गुन्हा दाखल करावा. मात्र महाविकास आघाडी सरकार अजुनही शांत असुन सरकारची चुप्पी का आहे? असा सवालही विचारण्यात आला आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉॅ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर, एकनाथ आटकर, माजी सभापती काकासाहेब शिंदे, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, शहराध्यक्ष अजय भंडारी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,
तालुका सरचिटणीस जे. बी. वांढेकर, आदिनाथ धायतडक, नगरसेवक नामदेव लबडे, अनिल बोरूडे, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख नारायण पालवे, युसुफ शेख, शिवाजी मोहिते, दादासाहेब येढे आदी उपस्थित होते.
Comments