त्यानंतर दोन दिवस दाट धुकेही राहणार । हवामान अभ्यासक पंजाब डक यांचा अंदाज
अहमदनगर । वीरभूमी- 21-Jan, 2022, 10:03 AM
शनिवार दि. 22 व रविवार दि. 23 जानेवारी रोजी राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात पावसाचे थेंब पडणार आहेत. त्यानंतर सोमवार दि. 24 व मंगळवार दि. 25 जानेवारी रोजी दाट धुके राहणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत शेतकर्यांना देण्यात येणार्या संदेशात हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान मधील बहावलपूर येथे शुक्रवार दि. 21 जानेवारी रोजी चक्राकार स्थिती तयार होत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यात ढगाळ वातावरण राहुन पावसाचे थेंब येतील, असा अंदाज वर्तविला आहे.
मात्र पाकिस्तान, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू, हिमाचल प्रदेश, लडाख या राज्यात दि. 22, 23 व 24 जानेवारी रोजी खूप पाऊस पडणार आहे. तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार आहे.
यामुळे राज्यात शनिवार दि. 22 जानेवारी व रविवार दि. 23 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नंदूरबार, नाशिक, इगतपुरी, पालघर, पुणे, सांगली व इतर काही भागात पाऊस पडेल व काही भागात पावसाचे थेंब येत राहतील.
तर सोमवार दि. 24 जानेवारी व मंगळवार दि. 25 जानेवारी रोजी राज्यात दाट धुके राहणार आहे. यामुळे शेतकर्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिला आहे.
OmQVAPxIlC