विकासासाठी वाद न घालता सर्वांनी एकत्र यावे ः माजी खा. वाकचौरे
विकासासाठी वाद न घालता सर्वांनी एकत्र यावे ः माजी खा. वाकचौरे
अकोले । वीरभूमी - 24-Jan, 2022, 09:53 AM
कोणत्याही पक्षातून निवडणूक लढा मात्र निवडणुकीनंतर गावच्या, आपल्या परिसराच्या विकासासाठी कोणताही वाद न घालता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.सुगाव खुर्दच्या स्नुषा सौ शितल अमोल वैद्य या अकोले नगरपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सुगाव खुर्द गावच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे बोलत होते.अध्यक्षस्थानी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त ह भ.प. दीपक महाराज देशमुख होते.
यावेळी माजी सरपंच विष्णूपंत वैद्य, माजी उपसभापती संतोष देशमुख , सरपंच सौ. शुभांगी वैद्य, उद्योजक भारत पिंगळे, ज्येष्ठ पत्रकार प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, संदीप दातखिळे, पत्रकार अमोल वैद्य, सामाजिक कार्यकर्ते दीपक वैद्य, मनोहरपुरच्या सरपंच पद्माताई भांगरे, जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक सुभाष वैद्य, सचिन वैद्य, सुगाव सोसायटीचे चेअरमन एकनाथ वैद्य, माजी चेअरमन बाळासाहेब वैद्य, ज्ञानेश्वर दूध संस्थेचे संचालक दयानंद वैद्य, शांताराम वैद्य, सतिष वैद्य, लक्ष्मण वैद्य, केशव भांगरे, सतीश वैद्य, ग्रा.पं सदस्य सुनील पवार, इंदूबाई जाधव, केशव भांगरे, महेंद्र भांगरे, संजय वैद्य, मधुकर पवार, दादाभाऊ पवार, दामोदर वैद्य, सूर्यभान वैद्य, बाळासाहेब गुळवे, निवृत्ती वैद्य, रामनाथ पवार, शिवनाथ मदने, हौशीराम रोहम, बाळासाहेब दुटे, चंद्रकांत पवार, बाळू वैद्य, सुरेश पवार, विजय पवार, दिनकर वैद्य, किशोर वैद्य, भूषण वैद्य, सागर वैद्य, अक्षय वैद्य, जय वैद्य आदींसह ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुढे म्हणाले की, अमोल वैद्य यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने व संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्याने त्यांच्या पत्नी सौ. शितलताई या अकोले नगरपंचायतमध्ये नगरसेविका म्हणुन मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यांचा सत्कार गावच्या वतीने होतो ही बाब कौतुकास्पद आहे. सौ शितल या उच्च शिक्षित असल्याने व शिक्षिका असल्याने त्या निश्चित चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटवतील यात शंका नाही.
अध्यक्षीय भाषणात ह.भ.प. दीपक महाराज देशमुख म्हणाले की, मुलीचा सत्कार तर सगळेच करतात. मात्र सुनेचा सत्कार आज गावच्या वतीने होतो, ही बाब कौतूकास्पद आहे. आपली संस्कृती जपल्याचे ते लक्षण आहे. कोणी कितीही विरोध केला तरी आपल्या कामातून आपले कर्तृत्व सौ.शितलताई वैद्य सिद्ध करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी सरपंच विष्णुपंत वैद्य म्हणाले, अमोल वैद्य व शितल वैद्य यांनी अकोले तालुक्याच्या राजकारणात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या अनुभवाचा, जनसंपर्काचा आपल्या गावच्या विकासासाठी फायदा झालेला आहे व पुढेही होईल. अकोले नगरपंचायत निवडणूक लढविणे ही सोपी गोष्ट नाही, मात्र तेथेही त्यांनी विजय मिळवून गावाचे नाव तालुक्याच्या स्तरावर नेले ही बाब अभीमानाची आहे.
सत्काराला उत्तर देताना नूतन निर्वाचित नगरसेविका सौ. शितल वैद्य म्हणाल्या की, माझ्या विजयात सुगाव खुर्दच्या सर्व ग्रामस्थांचा मोलाचे योगदान आहे. मला कधीही सून म्हणून न वागविता एका मुलीप्रमाणे प्रेम दिले. मात्र काहींनी निवडणुकीत त्रास दिला, या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, कैलासराव वाकचौरे यांनी व भाजपच्या सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या विजयात मोलाचे योगदान दिले त्या सर्वांच्या ऋणात राहील. माझे पती अमोल वैद्य यांना मी माझ्या विजयाचे श्रेय देते. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून त्यामुळे मला विजय प्राप्त करता आला. भाषण करताना त्या भावुक झाल्या होत्या.
प्रास्ताविक माजी सरपंच एकनाथराव वैद्य यांनी केले. सूत्रसंचालन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण वैद्य यांनी करून आभार मानले.
Comments