अकोले नगरपंचायत भाजपाच्या गटनेतेपदी बाळासाहेब वडजे
अध्यक्षपदी सोनालीताई नाईकवाडी तर उपाध्यक्षपदी प्रतिभा मनकर । ना. रामदास आठवले पंचायतीला देणार 25 लाखांचा निधी
अकोले । वीरभूमी - 24-Jan, 2022, 09:50 PM
अकोले नगरपंचायत भाजपा आघाडीच्या गटनेतेपदी बाळासाहेब वडजे यांची दुसर्यांदा निवड करण्यात आली. तर अकोले नगरपंचायत भाजप आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. सोनालीताई नाईकवाडी, उपाध्यक्षपदी सौ. प्रतिभा मनकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची घोषणा माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा माजी आ. वैभवराव पिचड यांच्या हस्ते भाजपा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.दरम्यान, अकोलेच्या जनतेने आपल्या कामाची पावती म्हणून पुन्हा संधी दिली. त्या संधीचे सोने करून आपल्या प्रभागात असे चांगले काम करा की, मतदार व पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली पाहिजे, असा सल्ला भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आ. वैभवराव पिचड यांनी देत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच झालेल्या अकोले नगरपंचायत निवडणुकीत भाजपा व आर.पी.आय.युतीचे विजयी उमेदवारांचा पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आ. पिचड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ होते. यावेळी आर.पी.आय.चे राज्याचे नेते विजय वाकचौरे, अॅड. वसंतराव मनकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, सुधाकरराव देशमुख, राजेंद्र डावरे, मच्छिंद्र मंडलिक, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सोनालीताई नाईकवाडी, आरपीआयचे नेते चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, राजेंद्र गवांदे, शंभू नेहे आदींसह नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी नूतन नगरसेवक बाळासाहेब वडजे, शितल वैद्य, प्रतिभा मनकर, हितेश कुंभार, वैष्णवी धुमाळ, जनाबाई मोहिते, माधुरी शेणकर, कविता शेणकर, सागर चौधरी, तमन्ना शेख आदी नगरसेवक उपस्थित होते. तसेच प्रकाश साळवे, विजय पवार, मोसीन शेख, हुसेन शेख, अमोल वैद्य, परशुराम शेळके, रवींद्र शेणकर, बबलू धुमाळ, नवनाथ मोहिते, सौरभ देशमुख, देविदास शेलार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी वैभवराव पिचड म्हणाले की, आपल्या प्रभागात केलेल्या विकास कामाची, उर्वरित करावयाच्या विकासकामांची यादी तयार करावी. किमान आठवड्यातुन प्रभागात फिरून मतदारांच्या गाठी-भेटी घेवुन प्रभागातील प्रश्नांची माहिती करून घ्यावी. त्यासाठी नोंद वही ठेवावी, वरिष्ठांशी संपर्क साधावा. सोडविलेल्या प्रश्नांची नोंद ठेवावी. नागरीकांनी प्रत्यक्ष फिल्ड वर्क वर काम करणार्या नगरसेवकाला पुन्हा निवडून दिलेले आहे. मासिक मीटिंग घेण्यापूर्वी आपल्या गटाची मीटिंग घ्यावी, त्यामध्ये प्रश्न मांडावे, त्यानुसार मीटिंगचा अजेंठा बनवावा.
अभ्यास करून मीटिंगला जावे. गटनेत्याला सर्वांनी सहकार्य करावे. ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीत काही आश्वासने दिली. ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. निळवंडे धरणावर जाऊन 32 गाव अकोलेच्या पाणीपुरवठा योजनेची माहिती घ्यावी. नंतर जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांशी मीटिंग करावी. घरे नावावर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, केंद्राचा निधी आणण्यासाठी प्रस्ताव द्यावे लागतील, स्वच्छता अभियान चांगल्या रीतीने राबवून देशात नंबर आणण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदारांनी निवडून दिलेल्या सर्व नगरसेवक यांच्याशी सु संवाद ठेवून विकासकामे करावीत. आपले ध्येय हे अकोले शहराचा विकास हे असावेत. टीकाकारांना आपल्या कामातून उत्तर द्यावेत. भाजपच्या ध्येय धोरणानुसार कामे करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे मन की बात हा कार्यक्रम पहावा, त्यानुसार जनतेला सांगावा, सर्व नागरिकाना पहाण्यास सांगावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ म्हणाले की, सर्व नगरसेवकांनी सर्वानी विकास आराखडा बनवून त्याप्रमाणे कामे पूर्ण करावेत. प्रत्येक प्रभागात जनसंपर्क कार्यालय सुरू करावे. नागरिकांशी संवाद ठेवावा. इतके चांगले काम करा की पुढील वेळेस मतदार सर्वच्या सर्व नगरसेवक आपले निवडून देतील. आपण चांगले सक्षम उमेदवार दिले होते, मात्र काही ठिकाणी गणित जमले नाही. असे असले तरी समोरच्याला बरोबर घेऊन विकास कामे करावी, अशा सूचना केल्या.
यावेळी अॅड. वसंतराव मनकर म्हणाले की, ही लढाई संपली नाही. आपल्याला वैभवराव पिचड यांना 2024 मध्ये आमदार म्हणून निवडून आणायचे आहे. नागरिकांना सन्मानाची वागणूक द्या, कर्मचार्यांना तशा सूचना द्या. अकोले शहर विधानसभा निवडणुकीत 90 टक्के आपल्या बरोबर राहिले पाहिजे असे काम करावे.
यावेळी आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे म्हणाले की, लोकांचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यात सरकार वेगळे आहे, केंद्रातील निधी आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री ना. आठवले यांच्या कडून 25 लाख निधी मिळणार असल्याचे यावेळी सांगितले. महिला नगरसेविकांनी नगरपंचायत समजावून घ्यावी, त्या प्रमाणे आपल्या कामाचा ठसा उमटविला पाहिजे. आम्ही वैभवराव पिचड यांना 2024 मध्ये आमदार करण्यासाठी सोबत राहणार आहोत, आम्हालाही सत्तेत सहभागी करून घ्यावे, असे सांगितले.
तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की, सर्वच कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या सारखा तळमळीचा युवक भाजपाला भेटला. माझ्या 40 वर्षाच्या काळात असा युवक अध्यक्ष मी पाहिलं नाही, असे गौरवोदगर त्यांनी काढले. पंतप्रधान मोदी यांचे सुदृढ बालक अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे यांनी केले तर राहुल देशमुख यांनी आभार मानले. यावेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
iRTNUwgAOxWSDHJp