वयाच्या 92 व्या वर्षी ब्रिच कँण्डी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन
मुंबई । वीरभूमी- 06-Feb, 2022, 10:08 AM
गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी ब्रिच कँण्डी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. 28 दिवसापूर्वी त्यांना कोरोना आणि निमोनियाची लागण झाली होती. काही दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. मात्र त्यांची प्रकृत्ती पुन्हा बिघडल्याने त्यांचे निधन झाले.
गेल्या आठ दशकांहून अधिक काळ त्यांनी अगणित गीते गाऊन त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या गीतामधून त्या अमर आहेत. त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील. त्यांनी वयाच्या 5 व्या वर्षीपासून गीत गायनास सुरुवात केली.
त्यांनी जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून अनेक स्वमैफलीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरवला आहे. त्यांनी गायलेली हजारो गाणी अजरामर आहेत.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्व देश दुःखात बुडाला आहे. त्यांचा अंत्यविधी शिवाजी पार्क येथे सायंकाळी होणार आहेत. तत्पुर्वी दुपारी 12.30 वाजता त्यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
zIEjqKrAxVifs