अहमदनगर । वीरभूमी- 20-Feb, 2022, 08:26 PM
दि व्यंकटेश ग्रुपच्या हॅबिटस बिल्डवेल प्रा.लि.कंपनीला नाशिक येथील कार्यक्रमात प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग रत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इमर्जिंग कन्स्ट्रक्शन कंपनी इन महाराष्ट्र या प्रवर्गात हॅबिटस बिल्डवेला रिसिल रिसर्च या मुंबई स्थित कंपनीच्यावतीने हा सन्मान हॅबिटलस बिल्डवेलचा सन्मान करण्यात आला.
व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे, सहसंस्थापक व सीईओ कृष्णा मसुरे, सहसंस्थापक व संचालक व्यंकटेश देशमुख, सहसंस्थापक, संचालक व हॅबीटस बिल्डवेलचे चेअरमन अनिल गुंजाळ यांनी हा पुरस्कार स्विकारला.
दि व्यंकटेश ग्रुपने 2011 बँकिंग क्षेत्रापासून आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. समविचारी व धडाडीच्या तरूणाईने एकत्र येवून उद्योजकतेच व बुलंद भारताच्या निर्मितीत योगदानाचे स्वप्न पाहून स्थापन केलेल्या व्यंकटेश ग्रुपचा प्रवास अल्पावधीतच यशोशिखर गाठणारा ठरला आहे.
अर्थसाक्षरता रुजवतानाच कृषी, सॉफ्टवेअर, शैक्षणिक, व्यंकटेश फौंडेशन अशा क्षेत्रात योगदान देताना तीन वर्षांपूर्वी गु्रपने हॅबिटस बिल्डवेलची मुहूर्तमेढ रोवली. यातही राष्ट्रनिर्मितीत समर्पित भावनेने योगदान हे व्यापक उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवले. देशाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा त्यातही रस्ते, पुल हे महत्वाचे घटक असतात.
दर्जेदार महामार्ग हे प्रगतीचे महाव्दार असतात. ते शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे काम करतात. ते जितके मजबूत तितका प्रगतीचा वेग अधिक हे सूत्र लक्षात ठेवून सर्वोत्कृष्ट रस्ते बांधणी, पूल उभारणीचे काम हॅबिटस बिल्डवेल करीत आहे.
शासनाच्या हातात हात घालून या कामात कंपनीने झोकून दिले आहे. तीन वर्षातील उत्कृष्ट काम व राष्ट्र निर्मितीत देत असलेल्या योगदानाची दाखल घेत रिसिलने राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्काराने हॅबिटस बिल्डवेलला गौरविले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना अभिनाथ शिंदे म्हणाले की, व्यंकटेश ग्रुपचा उद्देशच बुलंद भारताच्या निर्मितीत योगदान देणे हा आहे. पाश्चिमात्य देशांनी प्रगती साधली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दर्जेदार पायाभूत सुविधांची निर्मिती आहे.
आपण परदेशात गेल्यावर तिथल्या रस्त्यांचे कौतुक करतो. तसेच चांगल्या रस्त्यांचे जाळे भारतातही तयार झाले तर आपल्या देशाचीही तितकीच प्रगती होवू शकते. हेच ध्येय ठेवून हॅबिटस बिल्डवेल पहिल्या दिवसापासून समर्पित भावनेने काम करीत आहे. त्यामुळे कंपनीला मिळालेला हा पुरस्कार आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देणारा आहे.
या पुरस्कारामुळे व्यंकटेश ग्रुपमधील अधिकारी, कर्मचार्यांनी आनंदोत्सव साजरा करीत भविष्यातही देशासाठी असेच सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा संकल्प केला आहे.
yolUEOizYgknBrHm