अहमदनगर । वीरभूमी- 23-Feb, 2022, 03:15 PM
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये आज दुप्पटीने वाढ झाली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण 138 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे चिंता वाढू लागली आहे.
आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर सर्वोच्चस्थानी असून येथील आकडा 31 वर आहे. दुसर्यास्थानी राहाता तालुक्याचा क्रमांक लागतो. तर कोपरगाव तिसर्या स्थानी आहे.
मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी शुन्य आकडा असलेल्या तालुक्यांची संख्या घटली आहे. आय बुधवारी भिंगार, जामखेड व इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यावर आहे. तर इतर ठिकाणची आकडेवारी 31 च्या आत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मंगळवार पर्यंत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1132 एवढी आहे. तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकड्यामध्ये दोघांची भर पडून 7218 एवढा झाला आहे.
आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 31, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 100 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 07 असे एकुण 138 कोरोना बाधित आढळले आहेत.
आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 31, राहाता 28, कोपरगाव 25, पारनेर 7, पाथर्डी 7, नगर ग्रामीण 6, राहुरी 6, श्रीगोंदा 6, मिलटरी हॉस्पिटल 5, इतर जिल्हा 4, नेवासा 3, संगमनेर 3, कर्जत 2, शेवगाव 2, श्रीरामपूर 2, अकोले 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर भिंगार, जामखेड, इतर राज्य या ठिकाणची आकडेवारी शुन्यांवर आहे.
कोरोना बाधितांचा आकडा घटला असला तरी प्रत्येक नागरिकाने काळजी घेण्याची गरज आहे. यामुळे प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
ZstFgcYAIkpa