बोगस बिनशेती भूखंडांची पंन्नाशी
शेवगाव तहसीलदारांचा जिल्हाधिकार्यांना अहवाल । दोषींवर गुन्हे दाखल करा ः अरुण मुंढे
शेवगाव । वीरभूमी - 24-Feb, 2022, 12:50 PM
शेवगाव शहरात गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत तब्बल 55 गट नंबरमध्ये तहसीलदारांची बनावट सही व शिक्के वापरुन बोगस अकृषी आदेश (एन.ए. ऑर्डर) निघाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे हे प्लॉट खरेदी करणार्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र समिती नेमुन चौकशी करावी. तसेच यास जबाबदार असणारे महसुलचे अधिकारी, कर्मचारी व दलाल यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केली आहे.श्री. मुंढे यांनी शेवगाव नगरपरिषदेच्या हद्दीत तहसीलदार यांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून अकृषिक आदेश तयार करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरु आहेत. अशा बनावट आदेशाव्दारे भुखंडांची खरेदी-विक्री व्यवहार करण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे.
या सर्व प्रकरणांची चौकशी करून त्यास जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकार्यांनी शेवगाव तहसिलदारांना याबाबत चौकशी करुन 15 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल तहसिलदार यांनी जिल्हाधिकार्यांकडे सादर केला असून त्यात तब्बल 55 गटनंबर मध्ये तहसीलदारांच्या बनावट सही, शिक्के वापरुन बोगस एन.ए. ऑर्डर केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ज्या गटनंबरमध्ये जे बोगस आदेश तयार झाले आहेत. त्यातील काही गट काही हे आजी माजी जिल्हा परीषद सदस्य, इतर प्रतिष्ठीत नागरीक व खरेदी विक्री करणार्या व्यावसायिकांच्या नावावर आहेत. सदर बोगस आदेश हे सन 2018 ते 2021 या कालावधीतील असून त्या अगोदरही असे अनेक बोगस आदेश दिले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
या तीन वर्षाच्या कालावधीत एकुण 70 आदेश पारीत झाल्याचे तलाठी कार्यालयातील नोंदणीवरुन दिसुन येते. मात्र यातील फक्त 15 आदेशांची नोंद तहसील कार्यालयाकडे उपलब्ध आहे. उर्वरीत 55 आदेशाची कुठलीही नोंद तहसीलच्या दप्तरी नाही. त्यामुळे सदर गटनंबर मधील भुखंड घेणारे (प्लाट घेणार्या) नागरीकांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारचे बोगस आदेश दाखवून भुखंड अकृषिक आहे असे भासवायचे व अव्वाच्या सव्वा दराने त्याची विक्री करुन नागरीकांना फसवणार्या दलालांची टोळी शहरात कार्यरत असून यात भुखंड खेरदी विक्री करणार्या काही व्यावसायिकांचा ही सहभाग आहे.
तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बोगस अकृषिक असलेले गटनंबर पुढील प्रमाणे : 1) 1317/8, 2) 730/2, 3) 1309/1,/2, 4) 1312/1/अ/पै/प्लॉट नंबर 15 व 16, 5) 730/2 पै/ प्लॉट- 41, 54, 55, 31 व 32, 6) 1098/3 पै, 7) 731/1/ 3 पै, 8) 969/पै, 9) 1316/1 ब/पै, 10) 1157/2/2/ ब/ पै 11) 274/4/1 पै, 12) 229/1 पै, 13) 1318/3/2 पै, 14) 1098/3 पै, 15) 771/1, 16) 1323/1/ ड/2, 17) 697/1 पै, 18) 1323/1/ब, 19) 1171/ पै, 20) 241/ पै, 21) 1098/3 पै, 22) 292/पै, 23) 746/7, 24) 1157/1 पै/6, 25) 239/4/अ 26) 1410/1/2/पै, 27) 28) 724/1 पै/ प्लॉट-30, 29) 433/1, 30) 1134/4 पै, 31)1148/2, 32) 1150/2, 33) 771/1, 34) 371/1, 35) 1134/1, 36) 323/1, 37)1185/5, 38) 433/1, 39) 651/1, 40) 1202/2, 41) 1170/1 पै, 42) 651/2, 43) 323/1/4. आदी गटनंबरचा समावेश आहे.
दरम्यान, बोगस अकृषक आदेश करणारी टोळी तालुक्यात सक्रीय असून यामध्ये जे भरडले गेले आहेत. याबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. दोन दिवसापूर्वी तालुक्यात बोगस अपंग प्रमाणपत्र देण्याचे रॅकेट उघड झाले. त्यापुढे कोटीचा व्यवहार झालेले बोगस एन.ए. रॅकेट असून ते कोण करते हे सर्व शहराला माहीत आहे. याबाबतचे सर्व घोटाळे बाहेर काढून संबंधीतावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी दिला आहे.
RjGhmWwEP