श्रीगोंदा । वीरभूमी- 27-Feb, 2022, 04:29 PM
मी प्रत्यक्ष मंजूर कामांचे भुमीपूजन करतो, पोकळ आश्वासने देत नाही. लोकांच्या अडचणी समजून तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे. कामाच्या बाबतीत काही अडचणी आल्यास जनतेने माझ्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक माजी आ. राहुल जगताप यांनी केले.
नगर-श्रीगोंदा मतदार संघातील रायगव्हाण (वराळे मळा) येथील सिमेंट साठवण बंधर्याचे भुमीपूजन माजी आ. जगताप यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या बंधार्यासाठी औरंगाबाद महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अंतर्गत 22 लाख 11 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
साठवण बंधार्याचे भुमीपूजनानंतर माजी आ. राहुल जगताप म्हणाले, मतदारसंघातील जनता हेच माझे दैवत अन् त्यांच्या विकासासाठी आहोरात्र झगडत राहणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. या साठवण बंधार्याची येथील ग्रामस्थांची अनेक दिवसापासूनची मागणी होती. आज प्रत्यक्ष कामाला सुरवात केली, असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रायगव्हाणचे ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सभापती शंकरराव पाडळे, पंचायत समिती सदस्य अतुल लोखंडे, कुकडी कारखाना माजी संचालक बाळासाहेब पठारे, गोवर्धन हार्दे, मनोहर शिंदे, वाल्मीक खेडकर, रोहीदास कदम, सरपंच संजय रिकामे, उपसरपंच बाळासाहेब वराळे, मोहन हार्दे,
माजी चेअरमन सखाराम हार्दे, सोन्याबापू शिंदे, गणेश शिंदे, अमोल कदम, गणेश रिकामे, मानसिंग गायकवाड, विठ्ठल हार्दे, पप्पु हार्दे, आप्पा लाड, रघुनाथ हार्दे, बाळासाहेब जाधव, भाऊसाहेब हार्दे, हरीभाऊ जाधव, देविदास चावरे, सुरेश वराळे आदी उपस्थित होते.
NbHmLuJi