संगमनेर तालुका दुध संघाच्या चेअरमनपदी रणजीतसिंह देशमुख
व्हा. चेअरमनपदी राजेंद्र चकोर यांची बिनविरोध निवड
संगमनेर । वीरभूमी- 27-Feb, 2022, 04:58 PM
काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते व राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रमानांकित असणार्या संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक संघाची 2022-2027 या पंचवार्षिक करीता बिनविरोध निवडणूक पार पडली असून आज चेअरमनपदी रणजितसिंह देशमुख यांची फेरनिवड तर व्हा. चेअरमनपदी राजेंद्र चकोर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.संगमनेर तालुका सहकारी दुध संघाच्या अतिथी गृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड एक मताने करण्यात आली. यावेळी महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव पा. खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.
रणजितसिंह देशमुख यांच्या नावाची सूचना लक्ष्मणराव कुटे यांनी मांडली तर विलास कवडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर यांच्या नावाची सूचना संतोष मांडेकर यांनी मांडली तर भास्करराव सिनारे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक लक्ष्मणराव कुटे, आर. बी. रहाणे, विलासराव वरपे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबनराव बोर्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रम थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, प्रतिभाताई सोमनाथ जोंधळे, मंदाताई गोरख नवले, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका दूध संघाने अत्यंत कठीण परिस्थितीतून वाटचाल करताना नावलौकिक मिळवला आहे. दुष्काळी परिस्थितीत जोडधंदा म्हणून या दूध संघाने ग्रामीण विभागात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे. संगमनेरच्या सहकार हा राज्यात सर्वात चांगला असून सर्व सहकारी संस्था या सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे.
तालुक्याचे सलग आठव्यांदा प्रतिनिधित्व करताना कारखाना, दूध संघ या महत्त्वाच्या संस्थांच्या बिनविरोध निवड झाल्या. तर जिल्हा बँकेची निवडणूक ही यशस्वी झाली. कार्यकर्त्यांची मोठी फळी असून तालुक्यातील सर्व भागांना व सर्व समाजांना प्रतिनिधित्व देत काम केले जात आहे. नव्या-जुन्या यांचा मेळ घालत उत्कृष्ट कार्यकर्त्यांची फळी या तालुक्याला लाभली आहे.
कोरोनाच्या काळात दूध संघाने एक दिवसही बंद न घेता शेतकर्यांना मोठा दिलासा दिला. दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर करण्याच्या निर्णयासाठी महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी सातत्याने मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केला. आगामी काळात दूध व्यवसायात मोठी स्पर्धा आहे. खाजगीवाले या धंद्यामध्ये मोठ्या संख्येने आहेत. त्यांना कायद्याची बंधने नाहीत मात्र सहकाराला मोठे बंधने आहेत.
तरीही गुणवत्तेने काम करून आपल्या नावलौकिक प्रमाणे आगामी काळात काम करावे. असे सांगताना नवीन पदाधिकार्यांच्या कामाला व मागील संचालक मंडळाने ही अत्यंत चांगले काम केले असल्याने सर्वांना शुभेच्छा त्यांनी दिल्या.
रणजितसिंह देशमुख म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या समृद्ध सहकाराची परंपरा आपण यापुढेही जपणार असून अत्यंत सचोटीने व काटकसरीने दूध संघाच्या भरभराटीसाठी आपण काम करू. दूध व्यवसाय हा शेतकर्यांच्या जीवनाशी अत्यंत निगडीत असल्याने त्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी काम करू असेही ते म्हणाले.
यावेळी अमित पंडित, संपतराव डोंगरे, उपसभापती नवनाथ आरगडे, जि. प. सदस्य अजय फटांगरे, गणपतराव सांगळे, सुभाष पा. आहेर, साहेबराव गडाख, संपतराव गोडगे, अण्णा राहींज, भारत मुंगसे, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. गंगाधर चव्हाण, देवराम गुळवे, बापूसाहेब गिरी, मॅनेजर गणपतराव शिंदे, सुरेश जोंधळे, रमेश कोळगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
TboIZuXyj