माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते होणार वितरण
अकोले । वीरभूमी- 05-Mar, 2022, 09:11 PM
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण युवती पुरस्कार अकोले तालुक्यातील विरगाव च्या सरपंच कु.प्रगती रावसाहेब वाकचौरे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते व जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात, मृद जल संधारण मंत्री ना.शंकरराव गडाख, सांस्कृतिक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदर गौरव सोहळा आज सकाळी ११ वाजता एस.एम.जोशी सभागृह, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती स्वागताध्यक्ष सुदाम मोरे यांनी दिली.
.प्रगती वाकचौरे या अतिशय तरुण युवती असून विरगाव ग्रामपंचायत च्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजीमंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड, विरगाव ग्रामस्थांनी व तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
RUwrXBVCIZck