शिर्डी-तिरुपती स्पाइसजेटची विमानसेवा 29 मार्चपासून
मुंबई । वीरभूमी - 16-Mar, 2022, 02:05 PM
तिरुपती आणि शिर्डी या देशातील श्रीमंत देवस्थानांसाठी 29 मार्चपासून स्पाइसजेट विमानसेवा सुरू करणार आहे. अवघ्या एक तास 45 मिनिटांत हे अंतर आता कापता येणार आहे.
प्रारंभी आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा दिली जाईल. त्यासाठी 5 हजार 200 रुपयांदरम्यान तिकीट राहणार आहे. प्रतिसाद पाहून पुढे रोज सेवा देण्याबाबत विचार होणार आहे.
दक्षिण भारतातून भाविक मोठ्या संख्येने शिर्डीला येतात. तसेच राज्यातूनही तिरुपतीला जाणार्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. सध्या शिर्डीहून दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे. येथून कार्गो सेवा व नाइट लँडिंगबाबत हालचाली सुरू आहेत.
त्यासाठी राज्याच्या बजेटमध्ये 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार शिर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाची टर्मिनल इमारत उभी राहणार आहे.
टेकऑफ व लँडिंगची वेळ
तिरुपतीहून दुपारी 2 वाजता टेकऑफ. शिर्डीत दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी लँडिंग. शिर्डीहून दुपारी 4 वाजता टेकऑफ. तिरुपतीला सायंकाळी 5.20 वाजता लँडिंग.
fgMrtYVCNxsySEeB